scorecardresearch

भारत-पाकिस्तान फाळणीनंतर तब्बल ७५ वर्षांनी दोन कुटुंबीयांची झाली भेट, पण आता बदलला एकमेकांचा धर्म

१९४७ मध्ये फाळणीच्या वेळी एकमेकांपासून दूर झालेल्या दोन शीख बांधवांची कुटुंबे तब्बल ७५ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आली आहेत

Family Reunited After 75 years
सोशल मीडियामुळे दोन कुटुंबांची जवळपास ७५ वर्षांनी भेट झाली आहे. (Photo : Social Media)

सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा आहे असं म्हटलं जातं. या मीडियामुळे आपणाला अनेक गोष्टींची घरबसल्या माहिती मिळते. सध्या याच सोशल मीडियामुळे दोन कुटुंबांची जवळपास ७५ वर्षांनी भेट झाली आहे. १९४७ मध्ये फाळणीच्या वेळी एकमेकांपासून दूर झालेल्या दोन शीख बांधवांची कुटुंबे जवळपास ७५ वर्षांनी करतारपूर कॉरिडॉरवर भेटली ती या सोशल मीडियामुळे. तर एकमेकांना ७५ वर्षांनी भेटलेल्या या कुटुंबीयांनी एकमेकावर पुष्पवर्षाव करत भेट घेतल्याचे फोटोदेखील आता व्हायरल होत आहेत.

गुरदेव सिंग आणि दया सिंग यांचे कुटुंबीय गुरुवारी करतारपूर कॉरिडॉर येथे पोहोचले. गुरुद्वारा दरबार साहिब, करतारपूर साहिब येथे या दोन्ही कुटुंबीयांच्या भावनिक भेटीचं दृश्य अनेकांनी पाहिलं. तर यावेळी त्यांनी गाणी म्हणत आणि एकमेकांवर फुले उधळून आनंद व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही भाऊ मूळचे हरियाणा येथील होते. फाळणीच्या वेळी त्यांच्या दिवंगत वडिलांचे मित्र करीम बख्श यांच्यासोबत महेंद्रगड जिल्ह्यातील गोमला गावात राहत होते.

हेही पाहा- एका Weekend मध्ये बोगदा बांधल्याचा Video शेअर करत आनंद महिंद्रा म्हणाले; “वेळेची बचत…”

बक्श मोठे गुरदेव सिंगसोबत पाकिस्तानला गेला, तर छोटा दया सिंग आपल्या मामासोबत हरियाणात राहिला. पाकिस्तानात पोहोचल्यानंतर, बक्श लाहोरपासून सुमारे २०० किमी अंतरावर असलेल्या पंजाब प्रांतातील झांग जिल्ह्यात गेले त्यांनी गुरदेव सिंग यांना (गुलाम मुहम्मद) असे मुस्लिम नाव दिले.

हेही पाहा- जहाजातून उडी मारणं जीवावर बेतलं, पाण्यात पडायच्या आधीच शार्कने गिळलं; धक्कादायक Video व्हायरल

गुरदेव सिंग यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. गुरदेव यांचा मुलगा मुहम्मद शरीफ यांनी मीडियाला सांगितले की, त्यांच्या वडिलांनी अनेक वर्षांपासून त्यांचा भाऊ दया सिंगचा ठावठिकाणा शोधण्यासाठी भारत सरकारला पत्रे लिहिली होती. ते म्हणाले, सहा महिन्यांपूर्वी, आम्ही सोशल मीडियाद्वारे काका दया सिंग यांना शोधण्यात यशस्वी झालो. त्यानंतर या दोन्ही कुटुंबांनी करतारपूर साहिबमध्ये पुनर्मिलन करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी भारत सरकारला त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना व्हिसा देण्याची विनंती केली जेणेकरून ते हरियाणातील त्यांच्या वडिलांच्या घरी जाऊ शकतील.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-03-2023 at 14:41 IST
ताज्या बातम्या