Viral Video: सोशल मीडियावर कधी कुठलं गाणं व्हायरल होईल हे सांगता येत नाही. जेव्हापासून रील्स बनविण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे तेव्हापासून सतत विविध भाषांतील, विविध देशांतील नवनवीन गाणी व्हायरल होतात; ज्यावर लाखो लोक रील बनवतात. इतकेच नाही तर ही गाणी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही लावली जातात. समाजमाध्यमांवर भारतीय गाण्यांवर अनेक परदेशातील कलाकार आणि इन्फ्लुएन्सरदेखील ठेका धरताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर मराठी चित्रपट धर्मरक्षक संभाजी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. याच चित्रपटातील गाण्यावरही अनेक जण सुंदर व्हिडीओ बनवताना दिसत आहेत. याच गाण्यावर आता परदेशातील इन्फ्लुएन्सर ‘डान्सिंग डॅड’ ऊर्फ रिकी पाँड थिरकताना दिसत आहे.

समाजमाध्यमांवर खूप प्रसिद्ध असलेला रिकी पाँड नेहमीच भारतातील विविध गाण्यांवर डान्स करताना दिसतो. नुकत्याच काही दिवसांपूर्वी त्याने काली बिंदी या मराठी गाण्यावरही सुंदर डान्स केला होता. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही तो खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
a daughter angry on his father for Spreading things in the house
“नुसता पसारा करतात…” चिमुकलीने काढली वडीलांची खरडपट्टी, Video होतोय व्हायरल
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
the Indian soldier returned home safely After serving the country for 21 years
२१ वर्ष देशसेवा करून सुखरूप घरी परतला भारतीय जवान, पत्नीचे अश्रु थांबत नव्हते; VIDEO पाहून व्हाल भावुक
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
Video : konkani young guy dance so gracefully
“आपली संस्कृती दाखवायला लाजायचं नाही!” कोकणी तरुणाने केला भन्नाट डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रिकी पाँडने भगव्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा घालता असून तो ‘राजं संभाजी’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करीत आहे. यावेळी ते गाण्यातील प्रत्येक स्टेप सुंदर करत असून तो व्हिडीओमध्ये ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ असंदेखील म्हणतो. रिकी पाँडचा हा व्हिडीओ पाहून अनेक जण त्याचं कौतुक करत आहेत.

हेही वाचा: ‘सोनी कितनी सोनी आज तू लगती वे…’ गाण्यावर मुंबईतील रस्त्यावर परदेशातील तरुणांचा भन्नाट डान्स; VIDEO होतोय व्हायरल

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ricky.pond या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या गाण्याला आतापर्यंत एक लाखांहून अधिक व्ह्युज आणि १४ हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर युजर्स अनेक कमेंट्स करतानाही दिसत आहेत. त्यावर एकाने लिहिलेय, “सुंदर डान्स सर”, दुसऱ्या एकाने कमेंटमध्ये लिहिलेय, “तुम्ही भारतीय पेहरावात खूप छान दिसत आहात.” आणखी एकाने लिहिलेय, “एकदम जबरदस्त डान्स केला सर.” तर आणखी एकाने लिहिलेय, “मन जिंकलं सर तुम्ही.”

Story img Loader