भारतीय संघाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीला बऱ्याच काळापासून शतक झळकावता आलेले नाही, त्यामुळे त्याला अनेकदा ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. भारत दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्याआधीच विराटला सोशल मीडियावर एका यूजरने ट्रोल केले होते, ज्यानंतर तो त्याला ही ट्रोलिंग सुमारे ७ लाख रुपयांसाठी महाग पडली. यावरून नंतर तो स्वतः ट्विट करून रडताना दिसला .

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की काय झालं?

वास्तविक, भारत दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतील तिसर्‍या सामन्यापूर्वी चिकू नावाच्या एका ट्विटर युजरने कर्णधार विराट कोहलीचा फोटो शेअर करत लिहिले की, “उद्या विराट कोहलीने अर्धशतक ठोकले तर मी सर्वांना १०० रुपये देईन. जे माझे हे ट्विट रिट्विट + लाइक करतील.”

(हे ही वाचा: रेल्वे रुळावर बाईक चालवत होता तरुण, समोरून आली ट्रेन आणि…; बघा Viral Video)

पोस्ट व्हायरल

या युजरने ट्विट केल्यानंतर ७ हजारांहून अधिक लोकांनी त्याचे ट्विट रिट्विट केले. त्यानंतर तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाच्या पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या विराट कोहलीने पहिल्याच दिवशी अर्धशतक झळकावले. विराटच्या या खेळीनंतर या युजरचे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून या युजरने स्वतःचे ट्विट रिट्विट करताना रडणारा इमोजी शेअर केला आहे.

(हे ही वाचा: समुद्रात पोहताना पाठून आला व्हेल मासा आणि…; बघा Viral Video)

(हे ही वाचा: तो कुत्रा आहे असं वाटतंय? मग हा Viral Video शेवटपर्यंत बघाचं!)

‘असा’ रंगला सामना

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर संपूर्ण संघ पहिल्याच दिवशी केवळ २२३ धावांवर गारद झाला. विराट कोहलीने संघासाठी ७९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. त्याचबरोबर अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारानेही ४३ धावांचे योगदान दिले आहे. काबिसो रबाडा हा दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने भारतीय संघासाठी चार विकेट घेतल्या.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fans promise of giving 100 rupees for retweet before match failed as soon as virat hits a half century know what happened ttg
First published on: 12-01-2022 at 13:08 IST