Viral video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. असं म्हणतात आपण समजून घेतलं की, प्राणीही आपल्याला समजून घेतात. आपण जीव लावला की तेही आपल्याला जीव लावतात. आपले चांगले मित्र होतात आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपली साथ देतात. अशाच एका शेतकऱ्याने आपल्या वासरासाठी अनोखं रेनकोट शिवलंय. सध्या पावसाळा सुरू आहे अशात संपूर्ण वातावरण हे थंडगार झालेलं असत. आपण तर आपल्या घरात गोधडी घेऊन बसतो पण त्या प्राण्यांचं काय जे गोठ्यात बांधलेले असतात. गोठा बाहेर असल्याकारणाने थंडीची लाट तिथेही पसरते आणि माणसांना जशी थंडी वाजते तशीच थंडी प्राण्यांनाही वाजते. अनेकदा मालकाचे आपल्या प्राण्यांकडे दुर्लक्ष होते मात्र सध्याच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचे अनोखे प्राणी प्रेम दिसून आले.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गोठा आहे आणि गोठ्या आणखी जनावरंही आहेत. याचठिकाणी एक छोटसं वासरू दिसत आहे. शेतकऱ्यानं या वासराला थंडी लागू नये म्हणून छान रेनकोट शिवलं आहे आणि त्याला घातलं आहे. विशेष म्हणजे हा रेनकोट शेतकऱ्यानं स्वत:च्या हातानं पोत्याचा शिवला आहे. हे शेतकऱ्याचं आगळंवेगळं प्रेम पाहून तुम्हीही कौतुक कराल.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ marathi_newspaper नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत शेतकऱ्याचं कौतुक करत आहेत. एकानं म्हंटलंय, “शेतकरी आहे तो .. पोटच्या पोरासारखा अन् हाताच्या फोडा सारखं गोठ्यातल्या लक्ष्मी ला जपतो …त्याच्यासारखा देवमाणूस शोधूनही सापडणार नाही.” तर दुसरा म्हणतो, “शेतकरी दादा तुझ्या प्रेमाला तोड नाही…धन्य आहे तुजी माया” आणखी एकानं, “आजकाल सगळीकडे नुसते प्राण्यांसोबत काहीना काही वाईट होतानाचे व्हिडीओ दिसतात पणतुमचा हा व्हिडीओ बगून खूप बर वाटलं..खुप सुंदर आहे पिल्लू आणि त्याचे डोळे..”