Viral video: आपल्याला तर हे माहित आहे की, जुगाडच्या बाबतीत भारतीय लोकांचा हात कोणीही धरु शकत नाही. आपल्याकडे लोकांना प्रत्येक गोष्टीत जुगाड करण्याची सवय आहे. त्यामुळे दररोजच्या वस्तुंपासून ते अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी जुगाड करतात. भारतीयांच्या जुगाडाची बरोबरी कोणीही करु शकत नाही. यासंदर्भात सोशल मीडियावर तुम्ही बरेच व्हिडीओ किंवा फोटो पाहिले असणार जे तुम्हाला आश्चर्यचकीत करतात. अशातच शेतकरीही कशातच मागे नाहीत.यात हल्ली शेतीच्या कामातही अनेक प्रकारचे जुगाड वापरले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळही वाचतोय आणि पैशांची देखील बचत होतेय. शिवाय शेतीच कामही योग्य पद्धतीने होत असल्याचे पाहायला मिळते. यात अनेक शेतकरी रान डुक्करापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारच्या टेक्निक वापरत असल्याचे पाहायला मिळते. अशाप्रकारे एका शेतकऱ्याने रान डुक्करापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी एक ढासू जुगाड शोधून काढला आहे. ज्यामुळे डुक्करच काय कुणी माणूसही घाबरून पळून जाईल.

शेतकऱ्यांचा नाद करायचाच नाय

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
An emotional video of a delivery boy having food in the middle of the road while delivering an order went viral on social media
परिस्थिती सगळं काही शिकवते! डिलिव्हरी बॉयचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी
Diwali Jugaad Video how to clean diya in Diwali 2024 kitchen tips in marathi
गॅसवर दिवा ठेवताच कमाल झाली; दिवाळीआधी पणतीचा ‘हा’ VIDEO जरूर पाहा, दिवाळीत होईल मोठा फायदा
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
female police officer nearly kisses womans lips video viral
ऑन ड्युटी महिला पोलिस अधिकाऱ्याने मर्यादा ओलांडली, मान धरली, किस केलं अन्…; लज्जास्पद Video व्हायरल
Tiger effortlessly jumps across the river with a single leap Tiger Crossing River By Jump Animal Video
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! जंगलाच्या राजाचा ‘हा’ VIDEO पाहून कळेल आयुष्य कसं जगायचं

शेतकऱ्यांच्या शेतात आता धानपीक डौलाने उभे असते. शेतकऱ्यांना उदरनिर्वाहाकरिता चांगले पीक येणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी यावर्षी चांगले पीक येईल या आशेने शेतात खूप मेहनत घेतली आहे. मात्र सध्या रानडुकरे शेतात घुसून धानाच्या पिकांचे नुकसान करीत आहेत. यावरच शेतकऱ्यानं एक जबरदस्त जुगाड केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, शेतकऱ्यांचा नाद करायचाच नाय.

काय जुगाड केलाय?

आता तुम्ही म्हणाल असा काय जुगाड केलाय? तर या शेतकऱ्यानं एका काठीच्या टोकाला एक भांड लावलं आहे आणि या भांड्यात पाणी पडत आहे. हे भांड पाण्याने भरलं की ही काठी उलटी होते आणि खाली असलेल्या पत्र्यावर आदळते. यावेळी त्याचा जो आवाज होतो तो ऐकून डुक्कर घाबरून अजिबात शेतात येणार नाही. तसेच शेतकऱ्याला पिकाच्या रक्षणासाठी रात्रंदिवस शेतात राहावे लागणार नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मरण इतक्या जवळून कधी पाहिलंय का? घराच्या बाहेर येताच घडलं भयंकर; हृदय कमकूवत असेल तर हा VIDEO पाहूच नका

तसेच शेतीच्या सुरक्षेसाठी देशी जुगाड करण्यात शेतकऱ्याचा हात कोणी धरू शकत नाही. अनेक शेतकरी पक्ष्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारच्या युक्ती वापरतात, अशा प्रकारे अनेक शेतकऱ्यांनी पक्ष्यांना रोखण्यासाठी जुगाड शोधून काढले आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ royal_shetkari__7.12 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आहे. नेटकरीही या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Story img Loader