scorecardresearch

Premium

आरारारारा खतरनाक! शेतकऱ्याने मळ्यात उगवली जगातील सर्वात मोठी काकडी, वजन ऐकून डोकच धराल, पाहा Video

जगातील सर्वात मोठ्या काकडीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून इंटरनेटवर तुफान गाजला आहे.

Farmer Grows World Heaviest Cucumber
शेतकऱ्याने बनवली जगातील सर्वात मोठी काकडी. (Image-Instagram)

Farmer Grows World Heaviest Cucumber: जगात असे अनेक टॅलेंटेड लोक आहेत, जे त्यांच्या अजब गजब कारनाम्यांतून लोकांना चक्रावून टाकतात. अशाच एका माणसाचा थक्क करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. एका शेतकऱ्याने मळ्यात जागातील सर्वात मोठी काकडी उगवलीय. यामागंच कारण जाणून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या काकडीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून इंटरनेटवर तुफान गाजला आहे.

‘द सन’च्या रिपोर्टनुसार, विंस सजोडिन असं या शेतकऱ्याचं नाव आहे. विशेष म्हणजे विंसने त्यांचाच विक्रम मोडण्याचा कारनामा केला आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने जगातील सर्वात मोठा मॅरो (World’s heaviest marrow) बनवला होता. याचं वजन ११६. ४ किलो इतकं होतं. आता पुन्हा एकदा विंस यांनी गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड्सचा किताब जिंकला आहे. जगातील सर्वात मोठी काकडी बनवून त्यांनी २०१५ चा डेविड थॉमस यांचा विश्वविक्रम मोडला आहे.

Israeli airstrike flattens a high-rise building in central Gaza City after Hamas
Israel War: इस्रायलमध्ये परिस्थिती गंभीर! हल्ल्यात गाझामधील सर्वात मोठी इमारत जमीनदोस्त; Video व्हायरल
Metro tickets can be purchased on WhatsApp
मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता ‘या’ शहरात WhatsApp च्या मदतीने खरेदी करता येणार तिकीट
vodafone idea 99 198 128 and 204 rs plans
Vodafone Idea चे ‘हे’ आहेत सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन्स; कोणकोणते फायदे मिळणार? जाणून घ्या
eletric sunroof in suv under 10 lakh
Sunroof फीचर्स असलेली गाडी शोधताय? ‘या’ आहेत १० लाखांच्या आतील बेस्ट कार्स

इथे पाहा व्हिडीओ

मे महिन्यात लावलेल्या बियाणांतून ही काकडी उगवण्यात आल्याचं सांगण्याच येतंय. या काकडीला प्रत्येक दिवशी लिक्विड देण्यात आलं आहे. यामुळे पानांसह फळ वाढण्यात मदत झाली. विंस सजोडिन यांनी म्हटलंय की, त्यांचे कुटुंबिय त्यांना ‘विंस द वेज’ असं म्हणतात. तसंच पुढं ते म्हणाले, भाज्या ताज्या हवेसोबतच एका सीक्रेट फॉर्म्यूल्यामुळे एवढा मोठा आकार घेतात. हे खूप मोठं यश आहे. तापमानात बदल झाल्याने मला भीती वाटत होती. कारण बदलत्या तापमानामुळे काकडी फुटण्याची शक्यता असते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Farmer grows worlds heaviest cucumber in the vegetables farm wins guinness world record video viral nss

First published on: 24-09-2023 at 13:21 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×