Farmer Grows World Heaviest Cucumber: जगात असे अनेक टॅलेंटेड लोक आहेत, जे त्यांच्या अजब गजब कारनाम्यांतून लोकांना चक्रावून टाकतात. अशाच एका माणसाचा थक्क करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. एका शेतकऱ्याने मळ्यात जागातील सर्वात मोठी काकडी उगवलीय. यामागंच कारण जाणून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या काकडीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून इंटरनेटवर तुफान गाजला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘द सन’च्या रिपोर्टनुसार, विंस सजोडिन असं या शेतकऱ्याचं नाव आहे. विशेष म्हणजे विंसने त्यांचाच विक्रम मोडण्याचा कारनामा केला आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने जगातील सर्वात मोठा मॅरो (World’s heaviest marrow) बनवला होता. याचं वजन ११६. ४ किलो इतकं होतं. आता पुन्हा एकदा विंस यांनी गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड्सचा किताब जिंकला आहे. जगातील सर्वात मोठी काकडी बनवून त्यांनी २०१५ चा डेविड थॉमस यांचा विश्वविक्रम मोडला आहे.

इथे पाहा व्हिडीओ

मे महिन्यात लावलेल्या बियाणांतून ही काकडी उगवण्यात आल्याचं सांगण्याच येतंय. या काकडीला प्रत्येक दिवशी लिक्विड देण्यात आलं आहे. यामुळे पानांसह फळ वाढण्यात मदत झाली. विंस सजोडिन यांनी म्हटलंय की, त्यांचे कुटुंबिय त्यांना ‘विंस द वेज’ असं म्हणतात. तसंच पुढं ते म्हणाले, भाज्या ताज्या हवेसोबतच एका सीक्रेट फॉर्म्यूल्यामुळे एवढा मोठा आकार घेतात. हे खूप मोठं यश आहे. तापमानात बदल झाल्याने मला भीती वाटत होती. कारण बदलत्या तापमानामुळे काकडी फुटण्याची शक्यता असते.