अभिनेत्री सनी लिओनीची भारतातील लोकप्रियता यावरुनच दिसून येते की भारतीयांनी सर्वाधिक वेळा गुगल सर्च केलेल्या विषयांमध्ये दरवर्षी तिचं नाव आघाडीवर असतं. मागील काही वर्षांमध्ये चित्रपटसृष्टीत आपला जम बसवणाऱ्या सनीला जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. मात्र सनीला भारतामध्ये अभिनेत्री म्हणून ओळख मिळाल्यानंतर २०१८ साली ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली होती. विशेष म्हणजे कोणत्याही धक्कादायक खुलासे किंवा वक्तव्यांसाठी ती चर्चेत नव्हती तर एका मजेदार कारणामुळे तिच्या नावाची प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा होती. हे कारण होतं सनीचं एक पोस्टर.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की पाहा >> डोंगरकड्यावरील सेल्फीच्या नादात सोशल मीडिया स्टारचा मृत्यू; Instagram वर होते हजारो फॉलोअर्स

आंध्र प्रदेशमधील नल्लोर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात सनीचे दोन मोठ्या आकाराचे पोस्टर्स लावल्याचं बातमी समोर आली आणि सगळीकडे या पोस्टर्सचे फोटो व्हायरल झाले. या पोस्टरमध्ये सनी ही लाल रंगाच्या बिकीनीमध्ये दिसत आहे. तसेच या पोस्टरवर तेलगू भाषेत एक ओळ लिहिण्यात आलीय. या ओळीचं भाषांतर, “माझ्यासाठी रडू नका किंवा माझा मत्सर करु (जेलस वाटून घेऊ) नका.” आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या शेतकऱ्याने सनीचा हा असा पोस्टर आपल्या शेतात का लावलाय. तर यामागेही एक वेगळंच लॉजिक आहे. आपल्या शेतात पिकणाऱ्या शेतमालाला लोकांची नजर लागू नये म्हणून त्यांची दिशाभूल करण्यासाठी आणि शेतातील मालाऐवजी या पोस्टरकडे आधी नजर जावी म्हणून हा पोस्टर शेतात लावण्यात आलाय.

नक्की वाचा >> राज कुंद्रा प्रकरण : “सनी लिओनी तर असल्या उद्योगांची क्वीन, तिला अटक करुन जन्मठेपेची शिक्षा द्या”

सनीचं हे पोस्ट लावणाऱ्या ४५ वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे अक्कीनापल्ली चिनचू रेड्डी. “या वर्षी माझ्या १० एकर शेतामध्ये मला चांगलं उत्पन्न मिळालं आहे. मात्र यामुळे गावातील तसेच या शेताच्या बाजूने जाणाऱ्यांमध्ये माझ्या शेतातील शेतमालाची चर्चा रंगलीय. त्यामुळेच या लोकांची नजर लागू नये म्हणून मी सनी लिओनीचं मोठं पोस्टर शेतामध्ये लावलं. माझ्या या ट्रीकचा फायदा झाला असून आता माझ्या शेतातील शेतमालाकडे कोणी पाहत नाही,” असं अक्कीनापल्ली म्हणालेत. म्हणजेच त्यांनी सनीच्या या पोस्टरचा वापर बुजगावण्यासारखा केलाय. मात्र बुजगावणी ही पक्षांना घाबरवून पळून लावण्यासाठी असतात. इथे सनीचं पोस्टर हे लक्ष वेधून घेण्यासाठी लावण्यात आलं आहे. म्हणजेच शेतातील शेतमालावर लक्ष जाण्याआधी सर्वांचं लक्ष आधी या पोस्टरकडे जात आहे.

पोलीस आणि कृषी अधिकाऱ्यांना हे पोस्टर आक्षेपार्ह वाटलं नाही का यासंदर्भात बोलताना अक्कीनापल्ली यांनी आपण कोणत्याची कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही असं सांगतात. “आम्हाला शेतीमध्ये काय अडचणी येतात हे जाणून घेण्यासाठी कधी अधिकारी आमच्या शेताच्या बांधावर आले नाहीत. त्यामुळे त्यांना या पोस्टरबद्दल काही आक्षेप असण्याचं कारण दिसत नाही,” असं अक्कीनापल्ली यांनी सांगितलं आहे.

दरम्यान या पोस्टरमुळे पुन्हा चर्चेत आलेली सनी लवकरच ‘रंगीला’ आणि ‘शेरो’ या मल्याळम चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer in andhra pradesh placed sunny leone bikini posters on his farm to protect his crops from the gaze of the passerby scsg
First published on: 30-07-2021 at 08:14 IST