scorecardresearch

Video: उंच डोंगरावरुन गवताच्या पेंड्या क्षणात पोहोचवल्या घरात; शेतकऱ्यांचा जुगाड पाहून तुम्हीही कौतुक कराल

व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांनी डोंगरावरील गवताच्या पेंड्या खाली नेण्यासाठी अनोखा देशी जुगाड केल्याचं पाहायला मिळत आहे.

Viral Video of Desi Jugaad
आपल्या देशातील शेतकरी देशी जुगाड करण्यात खूप प्रसिद्ध आहेत. (Photo : Instagram)

आपल्या देशातील लोक देशी जुगाड करण्यात खूप प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या जुगाडांची दखल मोठमोठे उद्योगपतीही घेत असतात. शिवाय कोणतही काम सोपं आणि पटकन व्हावं यासाठी अनेकदा देशी जुगाडांचा शोध लावला जातो. आजकाल अनेक लोकांनी आपली अवघड कामं सोपी करण्यासाठी केलेल्या विविध जुगाडांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे पाहून अनेकदा आपणाला आश्चर्याचा धक्का बसतो.

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही शेतकरी डोंगरावरील त्यांचे अवघड काम सोपे करण्यासाठी भन्नाट अशी आयडीया वापरताना दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या अप्रतिम जुगाड पाहून नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक केलं आहे. खरं तर शेतीमधील काम ही खूप कष्टाची असतात. शिवाय अशा परिस्थितीत उंच डोंगरावर शेती करणं म्हणजे खूपच कष्टाचं आणि अवघड असं काम असतं. डोंगरावर शेती करताना शेतकऱ्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. सपाट जमीनीवर यंत्रांच्या साहाय्याने शेतीतील काही काम करता येतात. पण उंच डोंगराळ भागात शेती करताना मर्यादित संसाधनाचाच वापर करावा लागतो. त्यामुळे अशा ठिकाणी काम करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.

हेही पाहा- भाज्या ताज्या दिसण्यासाठी केमीकलचा वापर, नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या विक्रेत्याचा Video व्हायरल

हेही पाहा- १० कोटी वर्षांपूर्वी कशी दिसायची पृथ्वी, कसे निर्माण झाले पर्वत आणि समुद्र? पाहा थक्क करणारा Video

जुगाडाच्या मदतीने काम केलं सोपं –

सध्या व्हायरल होणारा एक व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हिडिओमध्ये काही शेतकऱ्यांनी उंच डोंगरावरील गवताच्या पेंड्या खाली नेण्यासाठी अनोखा देशी जुगाड केल्याचं पाहायला मिळत आहे. शेतकरी काम करत आहेत तो खूप डोंगराळ भाग दिसत आहे. त्यामुळे अशा ठिकाणाहून मालाची वाहतूक करण्यासाठी खूप वेळ घालवावा लागणार हे स्पष्ट दिसत आहे. पण या शेतकऱ्यांनी दोरीच्या साहाय्याने आपलं काम कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने केल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

व्हिडिओ होतोय व्हायरल –

व्हिडिओमध्ये एक शेतकरी गवताच्या पेंड्या दोरीवर बांधून टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी दोरीचा वापर करताना दिसत आहे. शेतकऱ्यांचा हा जुगाड पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. insaat_sanal1 नावाच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत शेतकऱ्यांच्या जुगाडाचे कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-03-2023 at 13:24 IST