Viral video: शेतीत प्रगती नाही, पिकांना भाव नाही, असं आपण अनेक वेळा ऐकलं असेल. मात्र, परिश्रमाला योग्य नियोजनाची जोड दिल्यास नक्कीच प्रगती शक्य आहे. आपल्या भारतात अनेक शेतकरी करोडपती आहेत. दरवर्षी ते आपल्या शेतात करोडो रुपयांचं उत्पन्न घेऊन मोठी आर्थिक प्रगती करतात. अशाच एका शेतकरी आज्जीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका मराठी आज्जीनं सर्वांनाच चकित केलंय. आश्चर्याची बाब म्हणजे याआज्जीनं चक्क भाजी विकून तब्बल एक कोटीचा बंगला बांधलाय. मोठमोठ्या उद्योजकांनी म्हटलंय की, व्यवसाय करण्यासाठी भरपूर पैसे नाही, तर तुमच्याकडे एक चांगली व्यवहार्य कल्पना असणं गरजेचं आहे. मात्र, या आज्जीनं थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे भाजी विकून एक साम्राज्य उभं केलंय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. शेतकऱ्याला पिकवता येतं; पण विकता येत नाही, असं म्हटलं जातं. बळीराजाला त्याच्या मालाचा योग्य भाव मिळत नाही. याबाबत नेहमीच खंत व्यक्त केली जाते. मात्र, कोल्हापूरच्या या आज्जी ४० वर्षांपासून भाजीपाला विकत आहेत. त्या हा भाजीपाला स्थानिक बाजारपेठांमध्ये विकून, लाखोंची कमाई करीत आहेत. भाजी विकून बांधला १ कोटीचा बंगला कोल्हापूरच्या गडहिंग्लज भागात शेवंती यादव या आज्जी भाजी विकत असताना एक तरुण त्यांच्याकडे गेला. तो त्या आज्जींबरोबर गप्पा मारताना त्यांनी सर्वांनाच धक्का दिला. या आज्जींना किती वर्षांपासून भाजी विकता, असं विचारल्यावर त्यांनी ४० वर्षं भाजी विकतेय, असं सांगितलं. तसेच त्यांनी भाजीपाला विकून तब्बल एक कोटीचा बंगला बांधला असल्याचंही सांगितलं. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आज्जी सांगतात की, त्यांनी १४ खोल्यांचा बंगला बांधला आहे. पुढे आज्जींना विचारण्यात येते की, रसायन टाकून भाजी पिकवली आहे का? त्यावर आज्जी, पैज लाव, असे म्हणत भाजीपाल्यासाठी शेणखत वापरत असल्याचं सांगत आहेत. रसायनाचा वापर करून घेतलेलं पीक खाल्यानं माणसांमध्ये आजारपणाचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्यामुळे सर्वांनी सेंद्रिय भाजीपाला खावा. त्यानं शरीर निरोगी राहील. पाहा व्हिडीओ हेही वाचा >> मुंगूसाशी पंगा घेणं पडलं भारी; विमानतळाच्या रनवेवर कोब्राशी भिडले तीन मुंगूस! घटनेचा थरारक VIDEO झाला व्हायरल "कोल्हापूरच्या आज्जीचा नाद नाय" एखाद्या कार्पोरेट कंपनीला लाजवेल असं नियोजन केल्यामुळं या अशिक्षित आज्जीनं अल्पावधीत आपलं स्वत:चं वेगळं वैभव उभं केलं आहे. हा व्हिडीओ actor_amoldesai नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. एका युजरने कमेंट केली आहे, "या आमच्या आजीच्या मावशी आहेत. त्यांचं नाव शेवंती यादव आहे. आमच्या सर्व पाहुण्यांमध्ये त्या खूप हुशार आहेत. त्यांचं बोलणं आणि त्यांच्या हुशारी व बुद्धीला सलाम." आणखी एका युजरनं, "जगात भारी आम्ही कोल्हापुरी. कोल्हापूरच्या आज्जीचा नाद नाय", अशी कमेंट केली आहे.