Farmer Viral Video: शेतकरी आशेचा डोळ्यांनी ज्याची वाट बघत असतो तो पाऊस. अशातच अचानक समोर अंधारून आले. गार वारा वाहू लागला, सर्वांच्या चेहर्‍यावर आनंदाची लहर उमटून गेली मनावरून सुखाचे मोरपीस फिरले… आणि खरोखरच पाऊस कोसळू लागला. पहिला पाऊस असतो सगळ्यांना आपलंसं करणारा, आनंद देणारा, आठवणी ताज्या करणारा आणि एक वेगळी ऊर्जा आणणारा. सगळेजण या पावसाची वाट बघत असले तरी सर्वात जास्त आनंदी तर आपला शेतकरीराजा होतो. कारण तो पूर्ण वर्ष त्याचीच वाट बघत असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशाच काही शेतकऱ्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर पावसाचे थेंब पडताच त्यांना झालेला हा आनंद कुणीही शब्दात व्यक्त करु शकत नाही. उत्साहाला कशाचेच बंधन नसते, अगदी वयाचेही नाही याचाच प्रत्यय सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतून येत आहे.

शेतकऱ्यांना पावसानं मारली मिठी

पावसाळा हा एक असा ऋतू आहे जो सर्वांना आवडतो. पावसाचे सौम्य रूप नेहमीच आनंददायक वाटते. नांगरणी पेरणी करताना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो. शेतातील पावसामुळे झालेल्या चिखल तुडवतानाही त्याला त्रासदायक वाटत नाही तर पिकांच्या भविष्याची स्वप्ने पाहत तो मनोमन सुखावतो असतो. एरवी वय झालं की अनेकजण अंथरुणाला खिळतात. परंतु, शेतात नाचणाऱ्या या शेतकऱ्यांच्या अंगात सळसळून उर्जा वाहताना दिसून येत आहे. पाऊस पडला म्हणून शेतकऱ्यांना आनंद झाला असून सर्वच शेतातच नाचायला लागले आहेत. शेतात कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना पावसानं मिठीच मारली असं म्हणावं लागेल. वर्षभर ज्या पावसाची आतुरतेने शेतकरी वाट बघतो तो पाऊस आल्यावर शेतकरी निश्चिंत होतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि आनंद तुम्ही पाहू शकता.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> धबधब्यात भिजायला जाताय? थांबा! तरुणासोबत काय घडलं पाहा; VIDEO पाहून थरकाप उडेल

हा व्हिडीओ shetkarii_brand नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओवर “एवढ्या कष्टात पण आनंद कसा घ्यायचा ते शेतकऱ्यांना विचारा” असं कॅप्शन लिहण्यात आलं आहे. . या व्हिडीओला लाखो व्ह्यूज गेले असून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर देत आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जो शेतकरी असेल त्यालाच कळेल आजोबांचा आनंद.” दुसऱ्या एका युजरने लिहिले, “पाऊस आला की आम्हा शेतकरी बांधवांना खूप आनंद होतो.” आणखी एका युजरने लिहिले आहे, “आमचा शेतकरी राजा खुश तर सगळा देश खुश, हा आनंद जगात नाही”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer viral video farmers dancing in the rain beautiful video goes viral on social media srk
Show comments