Shocking video: सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या शेतीच्या कामांची लगबग सुरू आहे. शेतीच काम करत असताना शेतकऱ्यांना नेहमीच सतर्क राहण्यास सांगितले जाते. कारण शेतात चिखलात काहीही लपून बसले असण्याची शक्यता असते. असंच एक उदाहरण सध्या समोर आलं आहे. एका शेतात साप अशा ठिकाणी लपून बसला होता की तुम्ही विचारही करु शकत नाही. याचा खतरनाक व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल.

शेतकरी मित्रांनो काळजी घ्या

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
Dirty Ice Cream Making Video never buy and eat 5 rupees ice cream in shop
पाच रुपयांत मिळणारे कप आईस्क्रीम खाणाऱ्यांनो ‘हा’ Video पाहाच; पुन्हा खाताना १०० वेळा कराल विचार
Boy teasing bull to over noise near his ear then bull revenge from boy shocking video
“काय गरज होती का?” बैलाच्या कानाजवळ वाजवला ताशा अन् शेवटी…; VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य
prank with sandwich seller | Funny Viral Video
“हे सँडविच कोणी बनवले?” तरुणाने जोराने ओरडत विचारले, विक्रेता घाबरत पुढे आला अन्… पाहा व्हायरल VIDEO
Teacher running towards classroom to resolve fight students gave surprise viral video
विद्यार्थ्यांची मारामारी होताच वर्गात धावत गेली शिक्षिका अन्…, पुढे घडलं काही भलतंच, पाहा VIRAL VIDEO
Leopard and dog Fight Dogs Fight With Leopard See Who Will Win In The War Animal shocking Video
“जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं” कुत्र्यांनी अवघ्या १० सेकंदात बिबट्याला फाडून टाकलं; VIDEO पाहून झोप उडेल
Ganpati aagaman rush in aagman sohala shocking video
गणपती आगमनाची भीषण बाजू; VIDEO पाहून थरकाप उडेल, पाहा आणि तुम्हीच सांगा हे कितपत योग्य?

शेतकरी होणं सोपी गोष्ट नाही. ऊन, वारा, पाऊस झेलत शेतकरी दिवस-रात्र शेतामध्ये कष्ट करीत राहतो. शेती करताना शेतकऱ्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. कधी पक्ष्यांपासून पिकाचं रक्षण करावं लागतं, तर कधी शेतात लपलेल्या सापापासून स्वत:चा जीव वाचवावा लागतो. त्यात पावसाळा सुरू झाला की, सापांचा वावर वाढतो. पावसाळ्यात मानवी वस्तीमध्ये साप शिरतात. त्यामुळे सावधगिरी बाळगावी लागते. साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. साप हा असा सरपटणारा प्राणी आहे की, जो कधीही, कुठेही दडी मारून बसलेला असू शकतो. गावात किंवा जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या मानवी वस्तीत साप हमखास पाहायला मिळतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सापाची भीती वाटते. दरम्यान, तुम्हीही शेतात फवारणी करायला जात असाल तर आधी हा व्हिडीओ नक्की पाहा.

नक्की काय घडलं?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हे शेतकरी केळीच्या प्लॉटमध्ये किटक नाशक फवारणी करत आहेत. यावेळी त्यांना एक साप लपून बसलेला दिसला. केळीच्या घडामध्ये हा साप अशाठिकाणी लपून बसलेला की तो कुणालाही सहज दिसत नव्हता. मात्र, शेतकऱ्याला साप दिसला आणि पुढचा अनर्थ टळला. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, शेतात जाताना काळजी घ्या. या व्हिडीओत दिसत आहे, पुढे हे शेतकरी या सापाला काठीने मारतानाही दिसत आहेत. विषारी सापाने चावा घेतल्यास प्रसंगी शेतकऱ्यांवर मृत्यूही ओढावते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मुंबई लोकलमध्ये “खंडाळ्याच्या घाटात गाडी चाले…” गाण्यावर तरुणींचा भन्नाट डान्स; VIDEO तुफान व्हायरल

हा व्हिडीओ official_banana_house नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.