Women Humiliated By Airport Workers: विमान प्रवासाची उत्सुकता अनेकांना असते. पण मुळात विमानतळावर पोहोचताच परिस्थिती वाटते तेवढी फॅन्सी आणि सहज नसते. तुम्हाला तुमचं सामान तपासून घेण्यासाठी मोठाल्या रांगा लावाव्या लागू शकतात. यात तुम्ही सामानाच्या वजनाची ठरवून दिलेली मर्यादा ओलांडली तर पुन्हा वेगळ्या रांगा लावून त्यासाठी वेगळा खर्च सुद्धा करावा लागतो. अनेकदा या रांगांमध्ये अतिउत्साही प्रवाशांच्या जाडजूड बॅग वादाचा मुद्दा ठरतात पण यावेळी बॅग नव्हे तर चक्क एका महिलेच्या वजनावरून एअरपोर्टवर गोंधळ झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तब्बल १६ लाख व्ह्यूज असलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, हा मार्च महिन्यातील व्हिडीओ असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये एका अतिवजन असलेल्या महिलेला एअरपोर्टच्या कर्मचाऱ्यांनी चक्क बॅगांच्या वजन करायच्या काट्यावर उभे केले होते. अति वजन असल्याने सुरक्षेचे कारण देत तिला वजन तपासून घेण्यास सांगण्यात आले होते. हा प्रकार चारचौघात घडल्यामुळे महिलेला संकोच व भीती वाटत असल्याचे तिच्या चेहऱ्यावर दिसत होते.

हे ही वाचा<< …म्हणून त्याने मित्राचा प्रायव्हेट पार्ट कापून काढला पळ; ओडिशामधील ‘त्या’ कुटुंबाने दिला आंदोलनाचा इशारा

व्हिडिओ सुरू असताना, अनेकांनी या महिलेची बाजू घेत कर्मचाऱ्यांना “तुम्हाला शंका असल्यास नीट व प्रायव्हसी राखून तपासणी करावी” अशीही विनंती केली होती. अनेकांनी या व्हिडीओखली कमेंट करत आपल्यासह सुद्धा असाच प्रकार घडला होता आणि त्यावेळी आयुष्यात कधी अशी लाज वाटलीच नव्हती असेही लिहिले आहे. यावर एका टिकटॉकरने व्हिडीओ बनवून स्पष्टीकरण दिले आहे. सदर महिला ज्या विमानाने प्रवास करणार होती त्याचा आकार लहान होता त्यामुळे वजनाचा समतोल राखण्यासाठी काहींना केबिनमध्ये बसवावे लागले म्हणूनच या महिलेला वजन तपासण्याची विनंती करण्यात आली होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fat women humiliated by airport workers video makes people say never been so ashamed in life disgusting treatment by airline svs
First published on: 04-06-2023 at 13:45 IST