scorecardresearch

Viral Video : वडील आणि मुलीचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावरचा जबरदस्त बाथरूम डान्स पाहिला का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

हा व्हिडीओ pabloeveronicaoficial नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून नेटकऱ्यांनी या व्हिडीओला चांगलंच डोक्यावर घेतलं आहे.

srivalli viral video
वडील-मुलीची ही जोडी पोर्तुगालच्या प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर्स पैकी एक आहे. (Photo : Instagram / pabloeveronicaoficial)

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं जगभरातील प्रेक्षक कौतुक करत आहेत. फक्त चित्रपटच नाही तर या चित्रपटातील गाण्यांना देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. सोशल मीडियावर सध्या आपल्याला हिच गाणी ऐकायला मिळतील. सेलिब्रिटींपासून ते प्रभावशाली लोकांपर्यंत सगळेच त्याची कॉपी करण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकतंच एका वडील-मुलीच्या जोडीने पुष्पा चित्रपटातील लोकप्रिय गाणे ‘श्रीवल्ली’वर डान्स करतानाच आपला व्हिडीओ पोस्ट केला आहे.

पोर्तुगालच्या प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर ‘श्रीवल्ली’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स

वडील-मुलीची ही जोडी पोर्तुगालच्या प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर्स पैकी एक आहे. दोघे अनेकदा बाथरूममधील आरश्यासमोर उभं राहून डान्स करताना दिसतात. सध्या ‘पुष्पा’ या दाक्षिणात्य चित्रपटाची जादू सगळ्यांवरच झालेली दिसतेय. मुख्य म्हणजे या चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ हे गाणे जगभरातील अनेक प्रेक्षकांना आवडलंय. फक्त पोर्तुगालच नाही तर टांझानिया, ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमध्ये ही या गाण्याची क्रेझ पाहायला मिळतेय. या वडील-मुलीच्या जोडीने या गाण्याच्या हुक स्टेपची नक्कल तर केलीच पण सोबतच एक ट्विस्ट देखील दिला आहे. इंस्टाग्रामवर अपलोड केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत ४ मिलियनपेक्षा जास्त वेळा बघितला गेला आहे.

मुस्लीम जोडप्यांमध्ये वाढतोय ‘Unboxing By Husband’ चा ट्रेंड; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण

जाहिरातीत खराखुरा वाघ वापरल्याने Gucci ची झाली गोची; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

जगभरात गाजतोय अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ चित्रपट

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये पोर्तुगालच्या बाप-लेकीची जोडी अल्लू अर्जुनचे हिट गाणे ‘श्रीवल्ली’च्या हिंदी व्हर्जनवर डान्स करताना दिसत आहे. दोघेही हुक स्टेप्स करताना दिसत आहेत पण त्यांनी त्यात स्वतःचा ट्विस्ट जोडला आहे. हा व्हिडीओ pabloeveronicaoficial नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून नेटकऱ्यांनी या व्हिडीओला चांगलंच डोक्यावर घेतलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Father and daughter bathroom dance on srivalli song goes viral pvp

ताज्या बातम्या