पावसाळा सुरु झाले. विविध राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. सध्या पावसात भिजाणाऱ्या लोकांचे कित्येक मजेशीर व्हिडीओ समोर येत आहे. व्हिडीओ पाहून अनेकांना पावसात भिजण्याची इच्छा होत आहे. लहानपणी बहिण-भावडांबरोबर, मित्र-मैत्रिणीबरोबर पावसात भिजण्याचा आनंद आपल्यापैकी बहुतेकांनी घेतला असे. पण काहीही म्हणा पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद काही वेगळाच असतो. सध्या पावसात भिजणाऱ्या एका वडील आणि मुलाचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. आश्चर्याची गोष्टमध्ये एका कलाकारने हा क्षण सुंदर चित्रामध्ये रेखटाल आहे जे पाहून नेटकरी खूप खुश झाले आहे.

हेही वाचा – रस्त्यावर साचलेल्या पाण्यात भटक्या कुत्र्यांसह खेळतोय चिमुकला, Viral Video पाहून चेहऱ्यावर येईल हसू

artofchai नावाच्या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये घराच्या छतावर एका व्यक्ती आणि लहान मुलगा पावासात भिजण्याचा आनंद घेताना दिसत आहे. रिमझीम पावसामध्ये दोघे बाप लेक उड्या मारत, मज्जा करत पावसात भिजत आहे. मुलांची आई कोपऱ्यात उभी राहून मोबाईलमध्ये हा क्षण शुट करत आहे. व्हिडीओमध्ये एका कलाकाराने देखील हे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले आहे.. एवढचं नाही तर या सुंदर क्षणार अप्रतिम चित्र रेखाटून कलाकराने आपले कौशल्य दाखवले आहे. वडील आणि मुलाला पावसात भिजताना पाहून नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू घेऊन येत आहे पण या कलाकारने रेखाटलेले चित्र नेटकऱ्यांच्या हृदयाला स्पर्श करत आहे.

हेही वाचा – “अंधाऱ्या खोलीत म्हातारी मेली….” आजीनं घातलेलं कोडं तुम्ही सोडवू शकता का?,पाहा Viral Video

वडील आणि मुलाच्या नात्याच्या सुंदरा दर्शवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ वर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सुंदर, अप्रतिम, गोंडस अशा विविध प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या. एकाने लिहिले, “मला वडिलांची पोझ आणि कॅरेक्टर डिझाइन सर्वात जास्त आवडले!” दुसऱ्याने लिहिले, “त्याच्या भावनांचे सुंदर चित्रण केले आहे सर, अप्रतिम काम !”