scorecardresearch

Video: मित्रांसोबत पत्ते खेळत असताना अचानक वडिलांची एन्ट्री; हातात चप्पल घेऊन आले अन् थेट..

मुलाला पत्ते खेळताना पाहून वडिलांचा राग झाला अनावर, चप्पलेने असा मार दिला की पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

Video: मित्रांसोबत पत्ते खेळत असताना अचानक वडिलांची एन्ट्री; हातात चप्पल घेऊन आले अन् थेट..
photo: social media

लहानपणा पासूनच आपल्या मुलावर चांगले संस्कार व्हावे यासाठी प्रत्येक आईवडील प्रयत्न करत असतात. आपल्या मुलाचे भविष्य उज्वल घडावे अशी इच्छा प्रत्येक पालकांची असते. लहानपणी अनेकदा असं घडतं की, मुलांना अभ्यास करायला बसवलं की ते ऐकत नाहीत. किंवा करायला बघत नाहीत. नेमक्या अभ्यासाच्या वेळेतच ही मुलं घरच्यांपासून लपून खेळायला बाहेर पडतात. पण ही गोष्ट जेव्हा पालकांना कळते तेव्हा त्यांचं काही खैर नसते. तुमच्यासोबत देखील असं नक्कीच झालं असेल. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हालाही हसायला येईल.

या व्हिडीओमध्ये एक बाप आपल्या मुलाला पत्ते खेळताना पाहून चप्पलने मारताना दिसत आहे. तुम्ही पाहू शकता की, एका ठिकाणी काही मुलं बसून पत्ते खेळत आहेत. दरम्यान, त्यातील एका मुलाचे वडील येतात आणि मुलाला पत्ते खेळताना पाहून त्याला चपल्लेने मारू लागतात. कदाचित हा मुलगा घरच्यांपासून लपून खेळायला आला असेल किंवा त्याचे असे पत्यासोबत खेळणे त्याच्या वडिलांना आवडले नसेल. पण या मुलाला पत्ते खेळताना पाहून वडिलांचा राग पाहण्यासारखा होता.

( हे ही वाचा: २ रिक्षाचालकांचा रस्त्यावरील ‘तो’ डान्स होतोय Viral; नागालँडचे मंत्री Video शेअर करत म्हणाले, ‘लोकांनी…’)

येथे पाहा व्हिडिओ

( हे ही वाचा: Video: चिमुकल्याने चालु स्कूटीचा अचानक अ‍ॅक्सिलेटर फिरवला अन्…; मुलांकडे दुर्लक्ष करणे जीवावर कसे बेतू शकते एकदा पाहाच)

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @HasnaZarooriHai नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला असून आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘वडिलांचे असे प्रेम आजकाल संपुष्टात आलंय.” हा व्हिडीओ आतापर्यंत १५ हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला असून, शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. त्याचबरोबर व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कंमेंटही दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-12-2022 at 13:41 IST

संबंधित बातम्या