Man Dances with His Daughter Viral Video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. तुम्ही आतापर्यंत अनेक डान्सचे व्हिडीओ पाहिले असतील, तसेच अनेक मनोरंजक व्हिडीओदेखील तुम्ही पाहिले असतील. तुम्ही मुलांचे आईसोबत अनेक व्हिडीओ पाहिले असतील, पण वडिलांसोबत क्वचितच एखादा व्हिडीओ तुम्ही पाहिला असेल. सध्या असाच एक बाप-लेकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बाप-लेकीचं नातं खूप खास असतं. मुलगी आणि वडिलांमधील नाते खूप गोड असते. वडील आपल्या मुलीला अगदी फुलासारखं जपतात. वडील आणि मुलीच्या नात्यातील आपलेपणा हा शब्दात व्यक्त करणे तसे अवघड आहे. सोशल मीडियावर तुम्हाला वडील आणि मुलीचे प्रेमाने भरलेले व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्या अशाच एका बाप-लेकीचं सुंदर नातं दर्शवणारा व्हिडीओ चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर सध्या एका बाप-लेकीच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा डान्स बघितल्यानंतर नेटकऱ्यांनी या बाप-लेकीच्या जोडीचं कौतुक केलं आहे. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडतोय.

या छोट्याशा व्हिडीओमध्ये वडील आणि मुलीने खूप धमाल केली आहे. दोघेही नाचताना दिसत आहेत. दोघेही १९६८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पडोसन’ चित्रपटातील किशोर कुमारने गायलेल्या ‘मेरे सामनेवाली खिडकी में’ या प्रसिद्ध गाण्यावर नाचताना दिसत आहेत. मुलगी जशी नाचते तशीच तिचे वडीलही नाचताना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव त्यांच्या मुलीपेक्षा चांगले दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये मुलीच्या एक्स्प्रेशनपेक्षा वडिलांचं एक्स्प्रेशन लोकांना जास्त आवडत आहे. या दोघांमधील ताळमेळ आश्चर्यकारक आहे. लोक सोशल मीडियावर मुलीपेक्षा वडिलांचे जास्त कौतुक करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडीओ

लोकांकडून कौतुकाचा वर्षाव

हा व्हायरल व्हिडीओ @ridima.singh नावाच्या अकाउंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ४० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला रोखता आले नाही. या दोघांचे कौतुक करून लोक थकत नाहीत. यावर लोक खूप कमेंटही करत आहेत. एका युजरने कमेंट केली, “सॉरी बेटी, तू चांगली आहेस पण काकांनी शो चोरला!” दुसऱ्या युजरने कमेंट केली, “यार तुझे वडील खूप चांगले आहेत, माफ करा मी तुला व्हिडीओमध्ये पाहू शकलो नाही.” दुसऱ्या युजरने कमेंट केली, “तू भाग्यवान आहेस की तुला असा बाप मिळाला.” अशा अनेक प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आलेल्या आहेत. सर्व जण बाप-लेकीचा डान्स पाहून खूश झालेले दिसत आहेत.