Father- Daughter Marriage Video : बाप-लेकीच्या अतिशय पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या एका घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यात एका ५० वर्षीय बापाने आपल्या पोटच्या मुलीबरोबर लग्नगाठ बांधली आहे. या घटनेचा व्हिडीओ पाहून लोकांनी आता तीव्र संताप व्यक्त केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे बाप-लेकीने लग्न केल्यानंतर एक व्हिडीओ बनवला आणि त्यात लोकांनी उपस्थित केलेल्या काही प्रश्नांची धक्कादायक उत्तरे दिली आहेत, जी ऐकून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही.

मुलीशी लग्न केल्यानंतर बापाची धक्कादायक प्रतिक्रिया

व्हायरल व्हिडीओमध्ये २४ वर्षीय मुलगी आणि तिचे ५० वर्षीय वडील एकमेकांच्या बाजूला उभे असल्याचे दिसत आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला मुलगी म्हणतेय की, हे माझे वडील आहेत आणि मी त्यांच्याशी लग्न केलं आहे. समाज आमच्या नात्याला मान्यता देणार नाही, पण आता आम्ही लग्न केलं आहे. कोणी आमचे नाते मान्य करो वा ना करो, त्याच्याशी आम्हाला काही घेणेदेणे नाही. यानंतर जेव्हा वडिलांना प्रश्न विचारला जातो की, ही तुमची मुलगी आहे का? ज्यावर त्यांनी होकारार्थी उत्तर देत म्हटले की, यामध्ये काय अडचण आहे? यानंतर प्रश्न विचारणारी व्यक्ती पुन्हा मुलीला विचारते की, वडिलांशी लग्न करताना तुला लाज नाही वाटली का? ज्यावर मुलीचे वडील उत्तर देतात की, कोणत्या जगात राहता तुम्ही? कशाला लाज वाटली पाहिजे?

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

व्हिडीओमध्ये मुलीला वय विचारले असता ती २४ वर्षांची असल्याचे सांगते, तर वडिलांचे वय ५० वर्ष आहे. यावेळी व्हिडीओ बनवण्याचे कारण विचारले असता मुलगी म्हणाली की, आम्हाला जगाला सांगायचे आहे, कारण लोक आमच्या मागे चर्चा करत असतात.

अशी ड्रायव्हिंग टेस्ट की लायसन्स पण नकोसे वाटेल! देताना १०० वेळा कराल विचार, VIDEO होतोय व्हायरल

व्हिडीओ खरा की पब्लिसिटी स्टंट, युजर्सचा सवाल

वडील-मुलीच्या लग्नाचा हा व्हिडीओ एक्सवर @JaysinghYadavSP नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ही एक टीकटॉकची क्लिप आहे, त्यामुळे हा व्हिडीओ खरा आहे की एकप्रकारचा पब्लिसिटी स्टंट आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, अनेक युजर्सनी हा व्हिडीओ खोटा असून मनोरंजनासाठी बनवल्याचे म्हटले आहे. तसेच काही युजर्स हा व्हिडीओ खरा असेल तर यातील वडील आणि मुलीला मानसिक उपचारांची गरज असल्याचे म्हटले आहे; तर काहींनी हे फार वाईट असून रील्ससाठी असे संतापजनक कृत्य करणे थांबवा, अशी विनंती केली आहे.

Story img Loader