scorecardresearch

‘तेरे मेरे मिलन की ये रैना’ म्हणत बाप-लेकीच्या जोडीने लाखो लोकांना वेड लावलं, हा VIRAL VIDEO एकदा पाहाच

या व्हिडीओमध्ये बाप-लेकीच्या जोडीने सोशल मीडियावर एक गाणं गाऊन लोकांची मने जिंकली आहेत. या बाप-लेकीच्या जोडीने हे गाणं इतकं सुंदररित्या गायलं आहे, की हे पाहिल्यानंतर तुमचा दिवस चांगला होईल, हे मात्र नक्की.

Father-Daughter-Viral
(Photo: Instagram/ ukulelegirl_official)

आपल्या सर्वांना गाणी आवडतात, म्हणून कधीकधी जेव्हा आपण कंटाळा येतो तेव्हा अनेकजण तास न तास गाणी ऐकतात. खरं म्हणजे काही लोकांच्या आवाजात अशी जादू असते, जो आवाज थेट काळजाला भिडतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बाप-लेकीच्या जोडीने सोशल मीडियावर एक गाणं गाऊन लोकांची मने जिंकली आहेत. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये बाप-लेक गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचं गाजलेलं ‘तेरे मेरे मिलन की ये रैना’ हे गाणं गाताना दिसून येेत आहे. हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवर जुही सिंगने तिच्या उकुलेले गर्ल ऑफिशियल पेजवर शेअर केला होता. या छोट्याश्या व्हिडीओमध्ये, ती उकुलेले वाजवत १९७३ रोजी रिलीज झालेल्या ‘अभिमान’ चित्रपटातील गाणे गाताना दिसत आहे. तिने अतिशय सुरेल आवाजात सुरुवात केली आणि तिचे वडीलही तिच्या सुरार सुर मिळवत तिला साथ देताना दिसून आले. वडील आणि मुलीच्या आवाजातील मधुरता आणि आवाजातील चढउतार लोकांना खूपच आवडले आहेत. त्यांचं हे भावपूर्ण सादरीकरण तुम्हाला वारंवार ऐकण्यास भाग पाडणारं आहे. या बाप-लेकीच्या जोडीने हे गाणं इतकं सुंदररित्या गायलं आहे, की हे पाहिल्यानंतर तुमचा दिवस चांगला होईल, हे मात्र नक्की.


हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर खूप शेअर केला जात आहे. या व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या मुलीचे नाव जुही सिंग असून तिच्या वडिलांचे नाव सूरज सिंग आहे. दोघेही जम्मू-काश्मीरचे रहिवासी आहेत. मुलगी आणि वडील अनेकदा एकत्र गातानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. 

आणखी वाचा : टांझानियाच्या त्या तरूणाचा नवा VIDEO VIRAL, आता या गाण्यावर लिप-सिंक करत घातला धुमाकूळ

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : हुंडा कमी दिला म्हणून नवरदेवाने लग्नाला दिला नकार, VIRAL VIDEO पाहून लोक संतप्त

बाप लेकीच्या या गायनाचे प्रत्येक व्हिडीओ शेअर होताच सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागतात. हा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत २५ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी या व्हिडीओला लाईक करत आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Father daughters beautiful rendition of lata mangeshkars tere mere milan ki yeh raina wins hearts vira video prp