Viral photo: सध्याच्या कलियुगात इंग्रजांचे राज्य पुन्हा उदयास आलेले दिसून येत आहे. शैक्षणिक क्षेत्रात अमूल्य बदल होत असताना मराठी शाळांकडे पालक वर्गाने पाठ फिरवल्याने प्राथमिक मराठी शाळांना घरघर लागलेली दिसून येत आहे. इंग्रजी शाळांना वाढती मागणी होत असताना मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे.इंग्रजी माध्यमाच्या शाळांना पर्याय म्हणून महाराष्ट्रात सेमी इंग्रजी शाळांचा धडाका सुरू झालाय. देशातील पालकांचा इंग्रजी माध्यमामध्ये ओढा जास्त आहे. आपल्या मुलांना चांगलं इंग्रजी बोलता यावं यासाठी आजकाल अनेक पालक हे आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच पाठवतात. मात्र एवढं करुनही जर मुलांना इंग्रजी आलंच नाहीतर काय? असाच एक मजेशीर प्रकार सध्या समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता तुम्ही म्हणाल असं झालं तरी काय? वडिलांनी आपल्या मुलीच्या खात्यात ४० हजार रुपये जमा केले. यावर त्या मुलीनं जे उत्तर दिलेय ते ऐकून वडील शॉक्ड झाले. ते म्हणताहेत, तुला इंग्रजी शाळेत घालून माझे पैसे वाया गेले. हा प्रकार पाहून तुम्हाला सुद्धा हसू आवरणार नाही.

या चॅटमध्ये वडील आपल्या मुलीसोबत संभाषण करत आहेत. वडिलांनी आपल्या मुलीच्या बँक खात्यात ४० हजार रुपये जमा केले. आणि त्यानंतर याबाबत मुलीला माहिती दिली. आता वडील इंग्रजीमध्ये मेसेज करताहेत तर मुलीला सुद्धा इंग्रजीतच उत्तर देणं भाग होतं. त्यामुळे 40K Deposited in your Account या वाक्यावर तिनं Found असं उत्तर दिलं. पण गंमत म्हणजे हे उत्तर चुकीचं आहे. अन् ही बाब वडिलांनीच तिच्या लक्षात आणून दिली. त्यांनी लगेचच Received असं तिचं उत्तर करेक्ट केलं. बरं, वडील एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी इंग्रजी शाळेत घालून माझे पैसे वाया गेले असा उपरोधिक टोला देखील आपल्या मुलीला लगावला. सोशल मीडियावर आता हे चॅट व्हायरल झाले आहेत.

पाहा चॅटचा फोटो

सोशल मीडियावर @VishalMalvi_ नावाच्या एक्स अकाऊंटवरुन ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे, आता यावर नेटकरी वेगवेगळ्या गंमतीशी प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, होतं असं कधी कधी, तर आणखी एकानं म्हंटलंय, पाठवा अजून इंग्लीश मिडियमध्ये अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father disappointed after seeing daughters english in whatsapp chat viral on social media srk