Father Emotional Video : वडील कुटुंबाचा आधार असतो. ते कमवतात, मुलाबाळांचे चांगले संगोपन करतात. लहानाचं मोठं करतात; पण वडिलांचा संघर्ष मात्र कोणाला दिसत नाही, ते कुटुंबासाठी घेत असलेली मेहनत दिसत नाही, त्यांच्या कष्टावर अनेकदा बोललं जात नाही. सध्या असाच एका वडिलांचा हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून नक्कीच तुमच्याही डोळ्यांतून पाणी येईल.
वडिलांच्या या भावनिक व्हिडीओतून त्यांच्या जीवनातील वास्तव, त्यांची मेहनत आणि संघर्ष प्रखरपणे दिसतोय. या व्हिडीओतून समजते की, प्रत्येक व्यक्तीमागे एक कहाणी दडलेली आहे; मग ती त्याच्या कठोर परिश्रमाची, जबाबदारी असू शकते.
व्हिडीओमधील दृश्य जरी साधे वाटत असले तरी त्यामागे एक अर्थपूर्ण कहाणी आहे. व्हिडीओमध्ये एका कंपनीचे अनेक फ्रिज एका टेम्पोमध्ये ठेवलेले दिसतायत. हे जड फ्रिज एक व्यक्ती एकट्याने खाली उतरून दुकानात ठेवतेय.
व्हिडीओ नीट पाहिला, तर ती व्यक्ती काम करून प्रचंड थकलीय. तिच्या चेहऱ्यावर ती घेत असलेली मेहनत स्पष्ट दिसतेय. काम करून ती एवढी थकलीय की, वारंवार ती आपल्या टी-शर्टने घाम पुसते आणि मग पुन्हा कामाला लागतेय. त्या व्यक्तीच्या प्रत्येक कृतीतून त्याचा शारीरिक थकवा दिसून येतोय, तरीही तो थांबायला तयार नाही, का काय तर जबाबदारीचे ओझं.
तिच्या डोळ्यांतून आणि चेहऱ्यावरील हावभावांतून हे स्पष्टपणे दिसून येते की, ती आपले काम सोडू शकत नाही. कदाचित त्याच्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या असतील किंवा कदाचित हे काम त्याच्यासाठी केवळ एक नोकरी नसून, कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचे एक साधन असेल. म्हणूनच थकवा असूनही तो न थकता काम करत राहतो.
या व्यक्तीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक लोक भावूक झाले आणि त्यांनी त्या कष्टकरी माणसाबद्दल आदर व्यक्त केला. लोकांनी असे मत व्यक्त केले की, अशा लोकांपासूनच आपल्याला खऱ्या कष्टाची जाणीव होते. हा व्हिडीओ केवळ एका व्यक्तीची मेहनत दाखवत नाही, तर आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी दररोज कठोर परिश्रम करणाऱ्या लाखो लोकांची कहाणी सांगतो.
आपण अनेकदा आयुष्यातील छोट्या छोट्या समस्यांनी हतबल होतो; पण अशा प्रकारचे व्हिडीओ आपल्याला वास्तवाची जाणीव करून देतात.
