आयुष्यात आई-वडील हा नातेबंध इतका महत्त्वाचा आहे की, त्याविषयी सांगताना शब्द अपुरे पडतील. आई नऊ महिने कळा सोसून आपल्या मुलांना जग दाखवते; तर वडील आयुष्यभर कष्ट करून मुलांना लहानाचं मोठं करतात, लहानपणापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. आपणं जे दु:ख भोगलं, ते मुलांच्या नशिबी येऊ नये म्हणून पायांतील चपला झिजल्या तरी स्वत:ची आबाळ झाली तरी मुलांना चांगले आयुष्य मिळावे यासाठी काबाड कष्ट करत राहतात. त्यानंतर मुले मार्गी लागली की, त्यांचे लग्न लावून दिले जाते. मात्र, ज्या मुलांना फुलाप्रमाणे जपले, त्याच मुलांना नंतर आई-वडील त्यांच्या सुखी संसारात अडथळा वाटू लागतात. मग आई-वडिलांना थेट वृद्धाश्रमाची वाट दाखवली जाते. पण, पोटचा मुलगा जेव्हा जन्मदात्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतो तेव्हा त्यांच्या मनाला किती वेदना होत असतील याची कधी विचार केला आहे का? नसेल, तर सोशल मीडियावर व्हायरल होणारा हृदयस्पर्शी व्हिडीओ एकदा पाहाच. जो पाहिल्यानंतर तुमच्याही डोळ्यांतून पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बापाने कवितेच्या माध्यमातून मांडली व्यथा

या व्हिडीओत वृद्धाश्रमातील एक निराधार बाप आपल्या मुलाला कवितेच्या माध्यमातून आर्त हाक देतोय. ती हाक ऐकल्यानंतर देवा, अशी वेळ शत्रूवरही येऊ नये, असे तुम्ही म्हणाल. अनेकांना व्हिडीओतील एका निराधार बापाचे ते बोल ऐकून अश्रू अनावर झालेत.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, वृद्धाश्रमातील एका कार्यक्रमात स्टेजवर एक निराधार बाप आपल्या पोटच्या मुलाकडे कवितेच्या माध्यमातून आपले दु:ख मांडताना दिसतोय. कवितेचे बोल आहेत,

भिजून ओली होते सदऱ्याची बाही, तुझ्या आठवणीने मन सारखं भरुन येईल…
तुझ्या आठवणीने मन सारखं भरुन येईल…
कधी कधी पोस्टमन तुझी मनीऑर्डर घेऊन येई…
कधी कधी पोस्टमन तुझी मनीऑर्डर घेऊन येई…
पैसे नकोत एवढे तुझे बाळा मला, बाळा तू स्वत: येऊन जा, बाळा मला आपल्या घरी घेऊन जा…

तुझी आई होती तेव्हा मला तिची चांगली साथ होती…
तू भेटायला येशील म्हणून लय दिवस जिती होती…
तू भेटायला येशील म्हणून लय दिवस जिती होती….
सांगत होती शेवटपर्यंत सगळ्यांना, येईल माझा राजा, अरे कधी घेतला अखेरचा श्वास, झाला नाही गाजावाजा…
माझ्या ह्रदयातील तुझा फोटो पाहून जा, बाळा मला आपल्या घरी घेऊन जा…
दुष्काळाच्या स्थानी बाळा जन्म तुझा झाला, तुझ्या सुखासाठी आम्ही चहा सोडून दिला…

बापाने लेकासाठी लिहिलेली कविता ऐकून उपस्थितांचे पाणावले डोळे

एका बापाचे हे बोल ऐकून तिथे उपस्थित लोकांनाही अश्रू अनावर झाले. या बापाने हलाखीच्या परिस्थितीत मुलांसाठी काय प्रकारचे कष्ट उपसले असतील याचा विचार करू शकता; पण तीच मुलं बापाच्या म्हातारपणी त्यांना आधार द्यायला नाहीत हे पाहून मनाला फार वेदना होतात. काळजाला भिडणारा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत.

एका निराधार बापाच्या वेदना जगासमोर आणणारा व्हिडीओ @shriyash8055 नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत अनेकांनी कमेंट्स करीत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. एक युजरने लिहिले की, “जर त्यांचा मुलगा हा video बघत असेल तर त्याला माझं असं म्हणणं आहे की, मूर्खा तुला थोडी जरी लाज असेल, तर घेऊन जा घरी वडिलांना… थोडं तरी घाबर तुझ्या कर्माला… काय तोंड दाखवशील रे देवाला वरती जाऊन… वडील आहेत जिवंत, तर त्यांना सांभाळ… बिचारे किती वाट पाहत असतील…”

मुंबई लोकलमध्ये तरुणीने ओलांडली मर्यादा! अश्लील कृत्य पाहून प्रवासी संतापले; VIDEO व्हायरल

“अशी मुलं जन्मत:च मेलेली बरी” व्हिडीओ पाहून युजर्स संतापले

दुसऱ्या युजरने लिहिले की, “अशी मुलं जन्मत:च मेलेली बरी”. तिसऱ्या युजरने लिहिले की, “बाप असणाऱ्यांना किंमत नसते, खरी किंमत त्यांना माहीत, ज्यांच्याकडे ते नाहीत”. तिसऱ्या युजरने लिहिले की, “यांच्या मुलाला विनंती आहे… थोडी मनातून लाज वाटू दे आणि पटकन घरी घेऊन जा. आणि राहिलेल्या आयुष्यात सेवा करण्याचं पुण्य कमव, नाही तर काय परिणाम होतील ते येणाऱ्या आयुष्यात तू बघशील, कर्म इथेच करायचं आणि इथेच फेडायचं, नशीब आहे तुझा बाप जिवंत आहे. ज्यांना आई-वडील नाहीत, त्यांना विचार काय असते ती अवस्था, जागा हो घरी घेऊन जा, सेवा कर”. चौथ्या एका युजरने मागणी केली की, “सरकारने कायदा काढावा, जी मुलं आई-बापाला सांभाळत नाहीत त्यांची संपत्ती जमा करावी.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father emotional video old age home living old father written emotinal poem for memory of an son see heart touching video sjr