Premium

“…नाहीतर तुला जीवे मारले जाईल”, ‘Iron Man’ चित्रपट पाहण्यासाठी ८ वर्षाच्या मुलाने वडिलांना दिली धमकी; पत्र व्हायरल

एका ८ वर्षाच्या मुलाने वडिलांना लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पत्र वाचून लोकांना धक्का बसला आहे कारण या पत्राद्वारे या चिमुकल्याने आपल्याच वडिलांना धमकी दिली आहे.

Father gets 'threat' note from 8-year-old who wants to watch Iron Man
वडिलांना ८ वर्षाच्या मुलाने दिली धमकी

सोशल मिडियावर अनेक अफलातून फोटो व्हायरल होत असतात जे लोकांचे लक्ष वेधून घेतात. सध्या अशाच एका फोटोची चर्चा सुरू आहे. एका ८ वर्षाच्या मुलाने वडिलांना लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पत्र वाचून लोकांना धक्का बसला आहे कारण या पत्राद्वारे या चिमुकल्याने आपल्याच वडिलांना धमकी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल होत असलेल्या फोटोमधील पत्र, एक प्रसिद्ध लेखक आणि बॅबिलोन बी म्हणून ओळखल्या जाणार्‍या व्यंगचित्राच्या वेबसाइटचे व्यवस्थापकीय संपादक, जोएल बेरी (Joel Berry) यांनी एक्सवर (ट्विटर) शेअर केले आहे. फोटोमध्ये हाताने लिहिलेले पत्र दिसत आहे जे त्यांना त्यांच्या मुलाने पाठवले आहे.

पत्रातील संदेश वाचून त्यातील बालिश लेखन आणि शुद्धलेखनाच्या चुका लगेच लक्षात येतात. जोएल बेरी यांना त्यांच्या आठ वर्षांच्या मुलांने हाताने लिहिलेले पत्र पाठवले आहे. त्यात लिहिले होते, “जोएल बेरी, महत्त्वाचा मेल त्वरित उघडा. आणि प्रिय जोएल बेरी, तुमच्या मुलांना आज रात्री आयर्न मॅन चित्रपट पाहू द्या नाहीतर तुम्हाला मारले जाईल. प्रति : सरकार”.

बेरीने ही खोटी धमकी त्यांच्या चाहत्यांसह शेअर केली, विनोदीपणे लिहिले की, “माझ्या ८ वर्षांच्या मुलाशी विचित्र साम्य असलेल्या एका पोस्टमनने आज माझ्या मेलबॉक्समध्ये हे जमा केले” आता मी त्यांना हा चित्रपट पाहू पाहू दे्यावा आणि आम्ही या घरात बेकायदेशीर सरकारी आदेशांचे पालन कसे करत नाही याबद्दल त्यांना एक महत्त्वाचा धडा कसा शिकवावा याच्या पेचात अडकलो आहेत.

पत्राच्या या फोटोला 81.5k पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. एकाने कमेंट केली की, “खूप गोंडस आणि आनंदी, अशा गोष्टींमुळे मला एक दिवस वडील व्हायचे आहे,”

बेरीने नंतर स्पष्च केले की, ”त्यांनी शेवटी आयर्न मॅन पाहिला.” त्यांनी त्यांच्या घरातील टेलिव्हिजनवर सुरु असलेल्या चित्रपटाचा स्नॅपशॉट पोस्ट केला आणि “सरकारने ही फेरी जिंकली” अशी खिल्ली उडवली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Father gets threat note from 8 year old who wants to watch iron man snk

First published on: 26-09-2023 at 17:24 IST
Next Story
भररस्त्यात बुरखा घातलेल्या शाळकरी मुली एकमेकींशी भिडल्या, बाजारातील हाणामारीचा व्हिडिओ होतोय VIRAL