Viral video: एकीकडे शेती शेती मालाला मिळत नसलेला भाव त्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात नेहमीच अश्रू पहायला मिळतात. कष्ट पाचवीला पुजलेल्या शेतकऱ्याच्या आयुष्यात नेहमीच समस्यांचे बांध असतात. मात्र, हे सर्व करत असताना शेतकऱ्याला त्याच्या मुला-बाळांकडेही तेवढंच लक्ष द्यावं लागतं. मात्र कधी कधी कामांमध्ये त्याला वेळ मिळत नाही. अशावेळी जबाबदारी आणि कर्तव्यामध्ये मेळ साधून शेतकरी राजा बरोबर मार्ग शोधतात. असाच एक औताच्या जुवाला बांधलेल्या झोक्यात झोपलेल्या बाळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.
आयुष्यात कितीही मोठ्या संकटाची लाट येऊ देत; बाबा हा किनाऱ्यासारखा भक्कम उभा असतो. आईबद्दल नेहमीच बोललं जातं मात्र पडद्यामागची भूमीका साकरणाऱ्या वडिलांकडे मात्र नेहमीच दुर्लक्ष होतं. अशाच एका शेतकरी वडिलांचा आणि त्याच्या लहान लेकराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कधी कधी अशी परिस्थिती असते की तिला तोंड देण्याशिवाय काहीच पर्याय नसतो. शेतकऱ्याने औताला झोका बांधून त्यात आपलं लेकरू झोपवलं आहे. शेतात कोळवणी करतानाचा जालन्यातली हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. युवा शेतकरी सोमनाथ कन्नर यांनी औताच्या जुवाला बांधलेल्या झोक्यात झोपलेल्या बाळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. पूर्वीच्या काळी शेतकरी आणि शेतमजूर महिलांना तसेच पुरुषांना मुलाबाळांना सांभाळण्यासाठी वेळ नसायचा तेव्हा लहान बाळांना औताच्या जुवाला झोका बांधून त्यामध्ये झोपवले जायचे. बैलाच्या गळ्यातील वाजणाऱ्या घंटाच्या निनादात आणि झोकावणाऱ्या झोक्यात बाळ अगदी शांत झोपायचं.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ना एसी, ना पंखा एका झोक्यात झोपलेलं बाळ पण त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद लाखमोलाचा आहे. ना सोन्याचा पाळणा ना चांदीचा चमचा तरीही हे शेतकऱ्याचं लेकरु खुदकन हसताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसु फुलेल एवढं नक्की.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> दंड बसू नये म्हणून ट्रक मालकानं शोधला खतरनाक जुगाड; पठ्ठ्याची नंबर प्लेट पाहून व्हाल थक्क, VIDEO एकदा पाहाच
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज गेले आहेत. यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ agri_diploma_katta पेजवर शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांच्याही हा व्हिडीओ चांगलाच पसंतीस उतरला असून नेटकरी भावूक झाले आहेत. नेटकरी व्हिडीओवर भावनिक प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे, बाप बाप असतो. तर दुसऱ्या एकाने “संघर्ष शेतकऱ्याच्या वाट्याला पाचवीला पुजलेला आहे” अशी कमेंट केलीय.