father and daughter viral video : पोळी-भाजी, भात डाळ ताटात दिसले की, लहान मुले नाक मुरडतात. पण, पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राइज, चिप्स किंवा पॅकेज्ड स्नॅक्स म्हटलं की लहान मुलांच्या चेहऱ्यावर लगेच आनंद दिसतो. चविष्ट आणि आकर्षक दिसणारे हे पदार्थ मुलांना आवडत असले, तरी त्यांचे वारंवार सेवन केल्याने त्यांच्या आहारातील पोषणाचा समतोल बिघडू शकतो. त्यामुळे मुलांना जंक फूड किती आणि किती वेळा द्यावे, तसेच त्यांच्या आहारात कोणते पौष्टिक पदार्थ असावेत, याकडे पालकांनी लक्ष देणे महत्त्वाचे असते.
अनेकदा वारंवार सांगूनही लहान मुले जंक फूड खाण्याचा हट्ट सोडत नाहीत. त्यामुळे मग काही हेल्दी फूड्स जंक फूड सारखे बनवून त्यांना खाऊ घालावे लागतात. तर असाच काहीसा जुगाड एका बाबांनी केलेला दिसतो आहे. अर्चना सिंग या इन्स्टाग्राम युजरने शेअर केलेल्या व्हिडीओत मुलीला ‘जंक फूड’ खाण्यापासून रोखण्यासाठी वडिलांनी एक मजेशीर प्रयोग केला आहे.
या प्रयोगात त्यांनी मुलीच्या पोटात ‘अळ्या’ (worms) आहेत का हे तपासण्यासाठी ‘स्कॅन’ करण्याचे नाटक केले होते. लेकीचे बाबा लॅपटॉपला जोडलेला ‘माउस’ (mouse) तात्पुरते ‘अल्ट्रासाऊंड डिव्हाइस’ म्हणून वापरतात आणि मुलीच्या पोटावर फिरवताना दिसतात आणि त्याचे प्रतिबिंब लॅपटॉपच्या स्क्रीनवर मुलीच्या पोटात अळ्या (worms) असल्याचे एक बनावट दृश्य (डेमोन्स्ट्रेशन) दाखवले जातात.
हे पाहून बाबांची लेक घाबरली आणि रडू लागली; त्यानंतर तिने आपल्या आईला मिठी मारली. पुढे तिने ‘जंक फूड’ कधीच खाणारी असे ठामपणे म्हणाली. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @archanasingh085 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “वडिलांनी केलेल्या एका बनावट अल्ट्रासाऊंड प्रयोगामुळे मुलीची ‘जंक फूड’ खाण्याची सवय एका फटक्यात सुटली” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
पण, व्हिडीओ युजर्सनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. अनेक जणांनी ‘काय हुशार बाबा आहे! मीही माझ्या भाच्यांसोबत/पुतण्यांसोबत हे करून पाहणार आहे’, ‘आता ती आयुष्यभर नाही विसरणार’, ‘एका छोट्याशा कृतीमुळे जंक फूडचे खूप पैसे वाचले’, ‘मुलांना या व्हिडीओ मार्फत मूर्ख बनवण्यात खूप मजा येते’, ‘तर व्हिडीओ पाहिल्यानंतर काहींनी प्रश्न उपस्थित केला की, ‘अयोग्य खाण्याच्या सवयी सोडण्यासाठी मुलाला घाबरवणे हा योग्य मार्ग आहे का?’ ‘प्रँक’मधून (मस्करीतून) मुलाला काय धडा मिळेल? मग मुले खोटे बोलू लागली किंवा इतरांची फसवणूक करू लागली की आपल्याला आश्चर्य वाटते. मग प्रश्न पडतो की त्यांनी हे कुठून शिकली ” असे आपण म्हणू
