एका व्यक्तीला आपला पाळीव कुत्रा गमावल्याचं एवढ दुखः झालं की त्याने त्या प्राण्यासाठी रुग्णालय उघडले. गुजरातमधील एका माणसाने वर्षभरापूर्वी आपल्या पाळीव कुत्र्याला सुविधांअभावी गमावले आहे, त्याने आता पाळीव प्राण्यांशी संबंधित सर्व गोष्टींचे निराकरण करण्यासाठी मल्टी-स्पेशालिटी आणि ना-नफा पशुवैद्यकीय रुग्णालय उघडले आहे. अहमदाबादमधील हे हॉस्पिटल ओटी रूम्सनी पूर्णपणे सुसज्ज आहे आणि हे भारतातील पहिले पशुवैद्यकीय व्हेंटिलेटर हॉस्पिटल बनले आहे.

एएनआयशी बोलताना बेस्टबड्स पेट हॉस्पिटलचे संस्थापक शैवल देसाई म्हणाले की, “एक वर्षापूर्वी माझा कुत्रा गमावल्यानंतर पाळीव प्राण्यांसाठी मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलची कल्पना आली. तो एक दुःखाचा काळ होता. चांगल्या सुविधांअभावी माझ्या कुत्र्यावर उपचार होऊ शकले नाहीत, तेव्हाच मी पाळीव प्राण्यांसाठी हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला.”

(हे ही वाचा: ‘हा’ आहे जगातील सर्वात श्रीमंत कुत्रा, जो विकतोय आपली २३० कोटींची संपत्ती! )

शैवल देसाई म्हणाले की, “आता मी पाळीव प्राण्यांशी संबंधित सर्व गोष्टींसाठी वन-स्टॉप सोल्यूशन उघडले आहे, म्हणजे पूर्णपणे सुसज्ज ओटी रूम आणि भारतातील पहिले पशुवैद्यकीय व्हेंटिलेटर असलेले ना-नफा पशुवैद्यकीय रुग्णालय.”

( हे ही वाचा: Video: “मॅन ऑफ द मॅच आम्हा पटेलांमध्येच राहील असे दिसते!” – हर्षल पटेल)

अफवांवर विश्वास ठेवू नकात

ज्येष्ठ पशुवैद्य डॉ. दिव्येश केळवया यांनी सांगितले की, कोविड-१९ दरम्यान कुत्र्यांमुळे कोरोना विषाणू पसरू शकतो या अफवांमुळे अनेकांनी कुत्रे सोडून दिले. मी लोकांना विनंती करतो की त्यांनी अशा अफवांवर आपले पाळीव प्राणी सोडू नये.