scorecardresearch

Premium

खतरनाक सापाला सहज हातात गुंडाळलं, तरुणीची हिंमत पाहून सर्वच झाले थक्क, पाहा व्हायरल video

एका तरणीने किराणा दुकानात घुसलेल्या खतरनाक सापाला पकडलं. व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

Indian Snakes Viral Video
तरुणीने खतरनाक साप पकडल्याचा व्हिडीओ व्हायरल. (Image-Instagram)

जंगलातून किंवा शेतात फिरत असताना अचानक समोर साप दिसल्यावर भल्या भल्यांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. अशातच जर एखादा विषारी सापाशी तुम्ही पंगा घेतला तर मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. पण सोसयटीत सापांचा वावर वाढल्यास लोक सर्पमित्रांना संपर्क साधून साप पकड्यास सांगतात. कारण सर्पमित्र अतिशय काळजीपूर्वक सापांना पकडतात आणि त्यांना जंगलात सोडतात. अशाच प्रकारचा सापाचा एक खतरनाक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एका सर्पमित्र तरुणीने सोसायटीत घुसलेल्या रॅट स्नेकला सहज पकडलं. रॅट स्नेक धामण जातीच्या सापासारखा दिसतो. पण या तरुणीने हिंमत दाखवून या सापाला पकडलं. तरुणीचा साप पकडण्याची पद्धत पाहून लोकही थक्क झाले. कारण या व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, सोसायटीत असलेल्या एका किराणा दुकानात घुसलेला मोठा साप या तरुणीने पकडला. तरुणी सर्पमित्र असल्याने या सापाला तिने सहज हाता गुंडाळलं आणि बॉक्समध्ये टाकलं. साप पकडण्याची तरुणीची हिंमत पाहून लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

hostlers narrow escape death as e scooter explode on sydney hostel watch shocking video viral
ई- बाईकचा स्फोट अन् टुरिस्ट हॉस्टेलला लागली आग; दोन तरुण थोडक्यात बचावले; घटनेचा धक्कादायक Video व्हायरल
Snake viral video
पावसाळ्यात बूट घालताना सावधान रहा! बुटात वेटोळे घालून बसलेल्या सापाचा VIDEO पाहून तुम्हीही थक्क व्हाल
Viral News Bride And Groom Fight Over Laddu In Wedding Ceremony Video Viral News In Marathi trending today
VIDEO: नवरीनं उष्टा लाडू खाण्यास दिला नकार, संतापलेल्या नवऱ्यानं भर मांडवात पकडला गळा अन्…
King Cobra Dangerous Video Viral
Video : सर्वात मोठ्या किंग कोब्राशी नडला! पण सापाने पाण्यातच तरुणाला घाम फोडला, फणा काढला अन्…

नक्की वाचा – ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी पठ्ठ्याने रिक्रिएट केला शाहरुख खानचा ‘जवान’ लूक, प्रवासीही झाले थक्क, पाहा Video

इथे पाहा व्हिडीओ

@shweta_wildliferescuer या इन्स्टाग्राम पेजवर सापाचा हा खतरनाक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून या व्हिडीओला ५ लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तसंच नेटकऱ्यांनीही प्रतिक्रियांचा वर्षाव करत या तरुणीचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, मलाही साप पकडायला शिकवा. कधीतरी याचा फायदा होईल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fearless woman catches rat snake easily people gives shocking reaction after seeing indian snake video nss

First published on: 22-09-2023 at 17:52 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×