प्राण्यांना काहीही खायला घालताना काळजी घेणे चांगले. खरं तर, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एका निष्पाप मुलाला जिराफाला खाऊ घालत असताना एक विचित्र घटना घडली. म्हणूनच प्राणिसंग्रहालयातील कोणत्याही प्राण्याला खायला घालायचे असेल तर सावध राहून खायला घाला आणि हा व्हिडीओ काळजीपूर्वक पहा.

वास्तविक, व्हायरल होणारा हा व्हिडीओ त्या लोकांसाठी धडा ठरू शकतो ज्यांना जनावरांना खायला द्यायचा आहे. जनावरांना खायला देणे ही चांगली गोष्ट असली तरी या काळात कधी कधी छोटीशी चूक महागात पडू शकते.

CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
Tiger from sanctuary missing after collar falls off Nagpur
‘कॉलर’ गळून पडल्याने अभयारण्यातील वाघीण ‘बेपत्ता’
Forest department staff succeeded in imprisoning a leopard that fell into a well
Video : बिबट्याची दोनदा हुलकावणी अन् जेरबंद करण्याचा थरार
High Court restrains demolition of loom department in Mafatlal
मफतलालमधील यंत्रमाग विभाग पाडण्यास उच्च न्यायालयाचा मज्जाव

(हे ही वाचा: महाकाय अजगराचा रस्ता ओलांडतानाचा Video Viral; नेटीझन्स म्हणतात असे दृश्य कधीच पहिले नाही)

प्राणीसंग्रहालयात आपल्या पालकांसोबत फिरायला गेलेल्या हा मुलगा जिराफला काहीतरी खाऊ देत होता. जिराफाला खाण्यासाठी एक डहाळी देताच, जिराफ त्या डहाळीसह मुलाला उचलून घेतो. हे पाहून मुलाचे पालक घाबरतात आणि त्यांनी लगेच मुलाला पकडून खाली ओढतात. खूप प्रयत्न करून मुलाला पकडून खाली घेतले जाते, तेव्हा आई-वडिलांच्या जीवात जीव येतो.

(हे ही वाचा: Video: स्मृती मानधनाचा ‘हा’ SIX एकदा बघाच; पाकिस्तानी खेळाडूची प्रतिक्रिया Viral)

(हे ही वाचा: Viral Photo:…तोपर्यंत लग्न करणार नाही, विराटसाठी चाहत्याने घेतला मोठा निर्णय)

ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला ३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर यूजर्स यावर विविध प्रकारे कमेंट करत आहेत.