दिल्ली विमानतळावर एका व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा झटका आला. दरम्यान तेथे उपस्थित असलेल्या एका महिला डॉक्टरने कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (CPR) देऊन वृद्ध व्यक्तीचा जीव वाचवला आहे. ही घटना व्हिडीओमध्ये कैद झाली असून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. महिला डॉक्टरचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

X वर सोशल मीडिया वापरकर्ता ऋषी बागरी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये, कथितपणे एक डॉक्टर असलेली महिला जमिनीवर पडलेल्या पुरुषावर कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (CPR) करत असल्याचे दाखवले आहे. बागरी यांच्या म्हणण्यानुसार, हा माणसाचे वय ६० पेक्षा जास्त असावे आणि त्याला दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर हृदयविकाराचा झटका आला होता.

हेही वाचा – Viral Video : निर्दयीपणाचा कळस! लेकरू पाणी मागत राहिलं अन् आईची अंगावर बसून अमानुष मारहाण, बुके मारले, चावली अन् जमिनीवर आपटलं डोकं

एका व्हिडिओमध्ये विमानतळावरील कर्मचाऱ्यांना बोलावताना डॉक्टर त्या माणसाच्या छातीवर हात ठेवून जोरात पंप करत असल्याचे दिसते आहे. दुसरा व्हिडिओ दाखवतो की, डॉक्टर CPR करत असताना तो माणूस पुन्हा शुद्धीवर आला आहे.

व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “आज टी २ दिल्ली विमानतळावर, ६० च्या उत्तरार्धात असलेल्या एका गृहस्थाला फूड कोर्ट परिसरात हृदयविकाराचा झटका आला. या महिला डॉक्टरने त्याला 5 मिनिटांत जिवंत केले. भारतीय डॉक्टरांचा खूप अभिमान आहे. कृपया हे शेअर करा जेणेकरुन तिचे कौतूक होईल. “

परिस्थितीला त्वरित प्रतिसाद दिल्याबद्दल नेटकऱ्यांनी डॉक्टरांचे कौतुक केले.

हेही वाचा – Video : शिक्षणाची सुरवात मातृभाषा मराठीतूनच व्हायला हवी! चिमुकलीने गायली सुंदर कविता,”म्याँव म्याँव म्याँव…येऊ का घरात?”

“त्या महिलांनी अक्षरशः यमराजाकडून काकांचा आत्मा हिसकावून घेतला. तिचा खूप अभिमान आहे,” असे एका वापरकर्त्याने कमेंट करताना म्हटले.

“हे खूप आनंददायी आहे की लोक आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी पुढे येतात. संस्कृतीला सलाम. डॉक्टर तुमचे आभार,” दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले.

एका व्यक्तीने ठळकपणे सांगितले की,”केवळ डॉक्टरांनाच नाही तर प्रत्येक व्यक्तीला सीपीआर कसे करावे हे माहित असले पाहिजे.”

“डॉक्टरांना सलाम! प्रत्येक भारतीयाने सीपीआर कसे करावे हे शिकले पाहिजे. जर्मनीमध्ये, हा प्रथमोपचार अभ्यासक्रमाचा एक भाग आहे जो ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी एक अनिवार्य पाऊल आहे,” वापरकर्त्याने सांगितले. काकांना वाचवणाऱ्या महिला डॉक्टरांची ओळख अद्याप पटलेली नाही.