Polar Bear Viral Video : ‘आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही’ असं म्हटलं जातं, होय ते सत्यच आहे. कारण आई ती आईच असते. तुमच्या आयुष्यात कितीही वाईट प्रसंग आला, तरी आईच्या प्रेमानं तुमचं मनं प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. मग ती माणसं असो वा प्राणी. बर्फाळ प्रदेशात उणे तापमानात राहणाऱ्या एका ध्रुवीय मादी अस्वलाने तिच्या पिल्लाला मायेनं जवळ घेतलं. अस्वलाचं गोंडस पिल्लू आईजवळ बागडत असल्याची सुंदर दृष्य कॅमेरात कैद झाली. मादी अस्वलाने तिच्या पिल्लाला बर्फाळ प्रदेशात दिलेली मायेची उब इंटरनेटवर लाखो नेटकऱ्यांच्या हृदयालाही स्पर्श करून गेलीय.

ध्रवीय अस्वलांच्या त्या व्हिडीओनं १० लाख लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय

@buitengebieden नावाच्या ट्विटर युजरने या धुव्रीय अस्वलांचा मनमोहक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना इतका आवडला आहे की, आतापर्यंत या व्हिडीओला १ मिलियनहून अधिक व्यूज मिळाले आहेत. बर्फाळ प्रदेशात एक मादी अस्वल तिच्या पिल्लासोबत बागडत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. प्राण्यांचा हा जबरदस्त व्हिडीओ ट्विटरवर शेअर करून कॅप्शनही देण्यात आलं आहे. ” आई आणि तिचं बाळ” असं सुंदर कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. तसेच ९ लाख ८० हजार लोकांनी या व्हिडीओला लाईकही केलं आहे. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.

PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
Bhandara District Jail, Female Guard, Assaulted, Detainee, crime news,
धक्कादायक! कारागृहातील बंदीवानाचा महिला रक्षकावर प्राणघातक हल्ला
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला

नक्की वाचा – आनंद महिंद्रा यांनी लोकांना केलं सतर्क, ट्वीटरवर शेअर केलेला AI जनरेटेड Video एकदा पाहाच

इथे पाहा व्हिडीओ

अस्वलांच्या व्हिडीओला प्रतिक्रिया देत एका नेटकऱ्याने म्हटलं, “आईने तिच्या बाळाला प्रेमाने जवळ घेतलं आहे, तिचं बाळंही खूप सुदंर दिसत आहे.” दुसरा नेटकरी म्हणाला, “जेव्हा तुम्ही आईच्या डोळ्यात पाहता तेव्हा ते सृष्टीवरील खरं प्रेम असतं.” अन्य एक नेटकरी म्हणाला, “हे किती सुंदर आहे. मला व्हिडीओ पाहून आनंद झाला.” एका साळींदर प्राण्याच्या पिल्लावर बिबट्या हल्ला करण्याच्या प्रयत्न होता. त्यावेळी मादी साळींदरने तिच्या पिल्लाला वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावली आणि बिबट्यापुढे गोल फिरू लागली. मादी साळींदरने पिल्ला वाचवण्यासाठी दाखवलेलं शोर्य पाहून बिबट्यानेही धूम ठोकली. हा व्हिडीओही इंटरनेटवर नुकताच व्हायरल झाला होता.