आयपीएल २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ६ धावांनी विजय मिळवत जेतेपदाला गवसणी घातली आहे. गेल्या १७ वर्षांची प्रतिक्षा संपवत या संघाने पहिल्यांदाच आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. गेल्या अठरा वर्षांपासून आरसीबीचे फॅन्स त्यांची टीम आयपीएल ट्रॉफी कधी उचलणार याची वाट होतो. या फॅन्सचं आरसीबीवर इतकं प्रेम आहे की हे त्यांच्य जवळच्या लोकांनाही सोडायला तयार आहेत. अलीकडेच, आरसीबीचा सामना पाहण्यासाठी आलेल्या एका महिला चाहत्याने स्टँड्समधून घोषणा केली होती की, जर यावेळी आरसीबी जिंकली नाही, तर ती तिच्या पतीला घटस्फोट देईल. आता आरसीबी जिंकल्यानंतर या महिलेचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.
क्वालिफायर १ च्या सामन्यात आरसीबीने पंजाबला हरवून अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. हा सामना मोहालीच्या महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झाला होता. तिथे ही फॅन याबाबतचा खास बोर्ड घेऊन आली होती. या बोर्डनं सर्वांचं लक्ष वेधलं.
यानंतर आता अखेर आरसीबी जिंकल्यानंतर या महिलेचा नवा व्हिडीओ समोर आला असून यावेळी तिचा आनंद गगनात मावत नाहीये. यावेळी तिनं खास केक कापत सेलिब्रेशनही केलंय. अखेर १७ वर्षाची प्रतिक्षा संपली आहे, सर्व आरसीबी फॅन्सचं अभिनंदन आणि ज्यांनी मला संपूर्ण सिझन शिव्या दिल्या त्यांनीही हा केक असं ती व्हिडीओमध्ये म्हणाली आहे.आरसीबी यापूर्वी तीनवेळा (२००९, २०११ आणि २०१६) फायनलमध्ये पोहोचली होती. पण, तिन्हा वेळा त्यांना पराभव सहन करावा लागला. त्यानंतरही आरसीबीच्या फॅन्सनी त्यांची साथ सोडलेली नाही. याचं कारण आहे टीम इंडियाचा सुपपरस्टार विराट कोहली.
पाहा व्हिडीओ
आयपीएल २०२५ स्पर्धेनंतर विराट निवृत्ती घेणार?
आयपीएल २०२५ स्पर्धा जिंकल्यानंतर विराट कोहली निवृत्तीची घोषणा करेल, अशी अफवा पसरली होती. पण अंतिम सामन्यानंतर त्याने स्पष्ट केलं आहे की, तो इतक्यात निवृत्तीची घोषणा करणार नाहीये.