सोशल मीडियावर विविध व्हिडीओ चर्चेत येत असतात. यामध्ये अनेक मजेशीर, विचित्र, भयानक, स्टंट, डान्स व्हिडीओ समोर येत असतात. नुकताच समोर आलेला व्हिडीओ डान्सचा आहे. अनेकदा हे डान्स इतके सुंदर असतात की, पाहणाऱ्याचंही अंग आपोआप हलायला लागतं. आता हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुमचेही होश उडतील. सध्या अशाच एका तरुणीचा डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामधील तिच्या अदा आणि डान्स स्टेप्सची सर्वांनाच भुरळ पडली आहे. तरुणीने जबरदस्त डान्स करत सर्वांनाच थक्क केलं आहे. या डान्समुळे तरुणी अभिनेत्री नोरा फतेहीला टक्कर देत आहे. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर खळबळ उडवत आहे.

इंटरनेटवर वेगवेगळ्या प्रकारचे डान्स व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. सोशल मीडिया हा डान्स व्हिडीओचा खजिना आहे. यामध्ये लोक अनेक प्रकारे नाचताना दिसतात. काही डान्स व्हिडिओ असे आहेत. जे पाहिल्यानंतर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. आता सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या या डान्समुळे सोशल मीडियावर सगळेच तिचे चाहते झाले आहेत. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

(हे ही वाचा : ‘कुमारी आंटी’चा जेवणाचा स्टॉल का आला होता संकटात? बिग बॉसमध्ये आंटी स्पर्धक म्हणून जाण्याची चर्चा )

महिला पोलीस कर्मचाऱ्याने केला जबरदस्त डान्स

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला पोलिस पोलिसांच्या गणवेशात नाचताना दिसत आहे. ‘मुघल-ए-आझम’ या चित्रपटातील “किसी दिन मुस्कुरा कर ये नजारा हम भी देखेंगे” या गाण्यावर ती डान्स करताना दिसत आहे. या गाण्यावर महिला पोलीस आपले एक्सप्रेशन्स अतिशय शानदारपणे दाखवत आहे. सोशल मीडियावर लोक या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल होत असून @shiya_thakur_si नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत तीस हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

येथे पाहा व्हिडिओ

व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया

या व्हिडिओवर लोकांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे की, “देश धोक्यात आहे’, तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, “लवकरच कारवाई केली जाईल, आम्ही माहिती काढत आहोत.” दुसऱ्या यूजरने कमेंट केली आहे की, “गणवेश बघा, तुम्ही तुमचे कर्तव्य पाडत का नाही?, दुसऱ्या युजरने कमेंट करत लिहिले, ‘मॅम, तुम्ही आमच्या जागेवर छापा मारायला कधी येत आहात?’, अशा प्रकारच्या वेगवगळ्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Story img Loader