scorecardresearch

लिओनेल मेस्सीसाठी पत्नीने अर्धवटच सोडलं होतं डेन्टिस्ट व्हायचं स्वप्न; जाणून घ्या मॉडेल असलेल्या एंटोनेला रोकुजोबद्दल

कोण आहे लिओनेल मेस्सीची पत्नी एंटोनेला रोकुजो? , जाणून घ्या

लिओनेल मेस्सीसाठी पत्नीने अर्धवटच सोडलं होतं डेन्टिस्ट व्हायचं स्वप्न; जाणून घ्या मॉडेल असलेल्या एंटोनेला रोकुजोबद्दल
जाणून घ्या लिओनेल मेस्सीच्या पत्नीबद्दल. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

फिफा विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना काल(१८ नोव्हेंबर) पार पडला. अर्जेंटिना व फ्रान्समध्ये झालेल्या रंगतदार सामन्यात लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने विश्वचषकावर नाव कोरले. २०१४ साली भंगलेलं विजयाचं स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्धारानेच मेस्सी मैदानात उतरला होता.

अर्जेंटिनाच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या मेस्सीने त्याच्या खेळीने संपूर्ण वातावरण मेस्सीमय करुन टाकले होते. लिओनेल मेस्सी उत्कृष्ट व लोकप्रिय फुलबॉल खेळाडूंपैकी एक आहे. जगभरात त्याचे लाखो चाहते आहेत. मेस्सीने फिफा विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर स्टेडियममध्ये एकच जल्लोष करण्यात आला. पंरतु, सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते मेस्सीची पत्नी एंटोनेला रोकुजो हिने.

फिफा विश्वचषक नावावर केल्यानंतर मेस्सीसाठी त्याच्या पत्नीने खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने मेस्सीवर गर्व असल्याचं म्हटलं आहे. यामागे मेस्सीची अनेक वर्षांची मेहनत असल्याचंदेखील एंटोनेलाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मेस्सी व एंटोनेला हे बालपणीचे मित्र आहेत. २००७ पासून ते एकमेकांना डेट करत आहेत.

हेही वाचा>> ‘हास्यजत्रे’तील कोहली फॅमिलीवर चाहत्यांनी बनवला रील; समीर चौगुलेंनी स्वत:च शेअर  केला व्हिडीओ, म्हणाले…

हेही वाचा>> Bigg Boss Marathi: विकास सावंत घराबाहेर पडताच ढसाढसा रडले किरण माने; भावूक होत म्हणाले “ईक्या लेका…”

एंटोनेलाने पदवी मिळाल्यानंतर डेन्टिस्टचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला होता. परंतु, मेस्सीला पाठिंबा देण्यासाठी तिने डेन्टिस्ट होण्याचे स्वप्न अर्धवटच सोडले. त्यानंतर तिने मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल टाकलं. तिने स्वत:चं ब्युटीकही सुरू केलं आहे. एंटोलेना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. तिचे इन्स्टाग्रामवर २४.६ मिलियन फॉलोवर्स आहेत. मेस्सी व एंटोनेलाने २०१७ मध्ये लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्यांना थियागो, मोटेओ व सिरो ही तीन मुले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-12-2022 at 10:17 IST

संबंधित बातम्या