Viral video: फेसबुक, यूट्यूब, ट्विटर हे असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, जिथे एखादा व्हिडिओ व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. एक काळ होता जेव्हा लोकांना केवळ टीव्हीवरच मजेशीर, हसवणारे आणि विनोदी व्हिडिओ पाहायला मिळायचे. मात्र आता सोशल मीडियाच्या निरनिराळ्या प्लॅटफॉर्मवर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ अतिशय विनोदी असतात तर काही व्हिडिओ भावुक करणारे असतात. मात्र विनोदी व्हिडिओ पाहायला लोकांना जास्त आवडतं. विशेषतः प्राण्यांच्या व्हिडिओला विशेष पसंती मिळते. अशातच यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडलीये. कोंबडा आणि कुत्र्याचा एक आश्चर्यकारक व्हिडीओ समोर आलाय. भररस्त्यात अनेक माणसे, प्राण्यांची भांडणे होत असतात. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये चक्क एक कोंबडा आणि कुत्र्याच्या भांडणाचा व्हिडीओ समोर आला आहे. एका गल्लीत कुत्रा आणि कोंबड्याचं जबरदस्त भांडण झालं आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका गल्लीमध्ये कोंबडा आणि कुत्रा जोरदार भांडण करताना दिसतायेत. एकमेकांच्या अंगावर धावत येऊन ते आपला राग व्यक्त करत आहेत. मात्र या भांडणाच मोठ्या कुत्र्यावर छोटा कोंबडा भारी पडलेला दिसला. कोंबड्याने आपल्या हिंमतीने कुत्र्यालाही पळवून लावलं. सुरुवातीला व्हिडीओ बघताना वाटलं की, कुत्र्यापुढे कोंबडा हार मानेल आणि पळ काढेल मात्र त्याच्या जिद्दीने आणि हिमतीने त्याने कुत्र्यालाच धूम ठोकायला भाग पाडले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

जेव्हा माणूस किंवा प्राणी भांडतात, तेंव्हा… काही लोकांचा संपूर्ण फोकस व्हिडिओ बनवण्यावर असतो. होय, ते भांडण संपवण्याचा प्रयत्न करत नाहीत. फक्त सर्व काही कॅमेऱ्यात कैद करायचे आहे. सोशल मीडियाच्या या जमान्यात ‘माणुसकी’पेक्षा ‘व्हिडीओ’ बनवण्याची भावना लोकांमध्ये झपाट्याने विकसित होत आहे. याची अनेक उदाहरणे तुम्ही स्वतः पाहिली असतील. त्यातलच हे एक उदाहरण.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> कृतज्ञतेची शक्ती! ज्या व्यावसायामुळे भरभराट झाली त्याचं व्यावसायाचं घराला दिलं नाव; PHOTO एकदा पाहाच

कुत्रा आणि कोंबड्याच्या भांडणाची ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. आसपासचेही लोक त्यांची भांडण पाहून शूट करताना दिसले. हा व्हिडीओ @ManojSh28986262 नावाच्या एक्स अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओवर अनेक लाईक्स आणि कमेंटचाही वर्षाव होताना दिसतोय. एकानं म्हंटलंय, “म्हणून कुणालाच कमी समजू नका” तर आणखी “एकानं कोंबड्याच्या हिमतीला सलाम” अशी प्रतिक्रिया केली आहे.

Story img Loader