Viral video: फेसबुक, यूट्यूब, ट्विटर हे असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, जिथे एखादा व्हिडिओ व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. एक काळ होता जेव्हा लोकांना केवळ टीव्हीवरच मजेशीर, हसवणारे आणि विनोदी व्हिडिओ पाहायला मिळायचे. मात्र आता सोशल मीडियाच्या निरनिराळ्या प्लॅटफॉर्मवर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ अतिशय विनोदी असतात तर काही व्हिडिओ भावुक करणारे असतात. मात्र विनोदी व्हिडिओ पाहायला लोकांना जास्त आवडतं. विशेषतः प्राण्यांच्या व्हिडिओला विशेष पसंती मिळते. अशातच यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडलीये. कोंबडा आणि कुत्र्याचा एक आश्चर्यकारक व्हिडीओ समोर आलाय. भररस्त्यात अनेक माणसे, प्राण्यांची भांडणे होत असतात. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये चक्क एक कोंबडा आणि कुत्र्याच्या भांडणाचा व्हिडीओ समोर आला आहे. एका गल्लीत कुत्रा आणि कोंबड्याचं जबरदस्त भांडण झालं आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा