Leopard Viral Video: सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात; तर काही व्हिडीओ मजेदार असतात. बऱ्याचदा जंगलातील प्राण्यांच्या या व्हिडीओंमध्ये कधी हिंस्र प्राणी इतर प्राण्याची शिकार करताना दिसतात; तर अनेकदा काही प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. जंगलात शिकार करण्यासाठी जेवढे परिश्रम जंगली प्राण्यांना करावे लागतात. तेवढेच परिश्रम त्यांना केलेली शिकार इतर प्राण्यांपासून वाचविण्यासाठी करावे लागतात. यासंबंधीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

बिबट्या सर्वांत चपळ प्राणी मानला जातो. बिबट्या डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच एखाद्या प्राण्याची शिकार करतो. तो आपल्या शिकारीच्या शोधात अनेकदा झाडावरही चढतो. एवढेच नाही, तर बिबट्या प्राण्याची शिकार केल्यानंतर ते भक्ष्यही घेऊन, तो झाडावर चढतो; जेणेकरून त्याचे भक्ष्य दुसऱ्या कोणत्या प्राण्याने पळवू नये. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे; ज्यात बिबट्या आपले भक्ष्य घेऊन झाडावर चढताना दिसत आहे,

Gang rape of young woman in Bopdev ghat due to fear of coyote Pune print news
बोपदेव घाटात कोयत्याच्या धाकाने तरुणीवर सामुहिक बलात्कार; बलात्कारापूर्वी आरोपींकडून लूट
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Shiv Sena Shinde group former corporator Vikas Repale received death threat
शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे यांना जीवे मारण्याची धमकी
Loksatta chaturang article about Kitchen transformation
स्वयंपाकघर ते किचन गोष्ट एका प्रवासाची
cops molested young lady attempted kidnapping two vasai policemen suspended
पोलिसांकडूनच तरुणीचा विनयभंग, अपहरणाचा प्रयत्न; नागरिकांनी पोलिसांना चोपले, वसईतील दोन पोलीस निलंबित
Loksatta editorial External Affairs Minister Jaishankar statement regarding the border dispute between India and China Eastern Ladakh border
अग्रलेख: विस्कळीत वास्तव!
High Court comment on Badlapur sexual assault case accused Akshay Shinde encounter Mumbai
हे एन्काउंटर नव्हे! उच्च न्यायालयाची टिप्पणी; थेट डोक्यात गोळी झाडण्याच्या कृतीवरही बोट
Naigaon police, Naigaon police saved women,
वसई : नायगाव पोलिसांचे १५ दिवसातील कौतुकास्पद कार्य, आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या तीन महिलांचे वाचवले प्राण

शिकाऱ्याचे काम फक्त जंगलात शिकार करणे नाही, तर सर्वांत मोठे काम शिकारीनंतर त्या भक्ष्याचे संरक्षण करणे हे आहे. या जगात जितके शिकारी आहेत, त्याहून अधिक दरोडेखोर आहेत, जे शिकाऱ्याची मेहनत झटपट खराब करू शकतात. तथापि, असे काही प्राणी आहेत, जे आपले भक्ष्य वाचविण्यात खूप हुशार असतात. अशाच प्राण्यांपैकी एक बिबट्या आहे, जो संधी मिळताच आपले भक्ष्य लपवतो.

(हे ही वाचा: पाकिस्तानी महिला भरपावसात रिपोर्टिंग करताना म्हणाली, “हे डिलीट करू नका”, व्हायरल Video पाहून हसू आवरेना)

नेमकं काय घडलं?

हा व्हायरल व्हिडीओ जंगलातील आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, बिबट्याने आपलं पोट भरण्यासाठी एका प्राण्याची शिकार केली अन् ते भक्ष्य जबड्यात पकडून निघून जात असताना अचानक तरस प्राण्यांचा गट तेथे येतो आणि बिबट्याकडून त्याची शिकार हिसकावून घेण्याची योजना आखतो. मात्र, बिबट्याला दरोडेखोरांचे प्लॅनिंग खूप आधी समजते आणि तो लगेचच आपली शिकार वाचविण्यासाठी तिथून पळ काढतो, ते बिबट्याच्या जबड्यातील आयती शिकार हडपण्याच्या प्रयत्नात असतात. परंतु, बिबट्या त्यांना एकही संधी देत नाही आणि आपल्या बुद्धीचा वापर करून आपल्या भक्ष्यासह एका झाडावर चढतो आणि लुटारूंचा समूह त्या शिकाऱ्याकडे फक्त पाहतच राहतो.

व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.instagram.com/p/C9uSQmPCOGq/?utm_source=ig_embed&utm_campaign=invalid&ig_rid=3000043b-e2a8-460e-957f-bb0480d1eadb

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर jojovi.africa नावाच्या अकाउंटने शेअर केला गेला आहे. त्याला नऊ हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे आणि कमेंट करून अनेकांना प्रतिक्रियाही दिल्या आहेत.