scorecardresearch

गवतात वेटोळे घालून बसलेल्या सापावर कावळ्याने केला हल्ला, सापानेही प्रतिहल्ला केला पण…, थरारक VIDEO पाहाच

व्हायरल व्हिडिओमधील दृश्य पाहिल्यानंतर काही वेळासाठी तुम्हीही गोंधळून जाल.

Fight between snakes and crows
कावळ्याने अचानक सापावर केला हल्ला. (Photo : Instagram)

सोशल मीडियावर वन्यजीवांशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडिओ असे असतात जे पाहिल्यानंतर आपल्याला डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण होतं. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसू शकतो. हो कारण या व्हायरल व्हिडिओमधील दृश्य पाहिल्यानंतर काही वेळासाठी तुम्हीही गोंधळून जाल. तुमच्यापैकी अनेकांनी साप आणि मुंगूस यांच्या भांडणाचे व्हिडिओ याआधी पाहिले असतील, पण तुम्ही कधी साप आणि कावळा यांच्यातील भांडणाचा व्हिडिओ पाहिला आहे का? नसेल तर तो देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कावळा आणि साप एकमेकांवर हल्ला करताना दिसत आहेत. या दोघांची लढाई कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्याचा व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

हेही पाहा- जोडप्याने पोलीस स्टेशनमध्ये घेतली धमाकेदार एन्ट्री, नंतर झाले रोमँटिक…, अनोख्या प्री-वेडिंग शूटचा VIDEO व्हायरल

Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
The employee boarded the truck to collect the toll from the truck driver
ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…
thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र

व्हिडीओमध्ये कावळा वारंवार सापावर हल्ला करताना दिसत आहे. तर कावळ्याच्या हल्यामुळे साप पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तो जंगलातील असल्याचं स्पष्ट होत आहे. तर एक कावळा अचानक झाडाखाली बसलेल्या सापावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. यावेळी कावळा सापावर हल्ला करण्यासाठी त्याच्याभोवती फिरताना दिसत असून साप कावळ्याच्या तावडीतून निसटण्याचा खूप प्रयत्न करत असल्याचंही दिसत आहे. मात्र, कावळा संधी मिळेल तेव्हा चोचीने सापावर हल्ला करतो. सतत हल्ला केल्यामुळे सापाची अवस्था बिकट झाल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर सापही कावळ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो पण त्याचवेळी कावळा पळून जातो.

व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क –

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे आणि शेकडो लोकांनी लईक केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी आश्चर्य व्यक्त करत साप इतका असहाय्य कसा असू शकतो? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर अनेकांनी हे दुर्मिळ दृश्य असल्याचं म्हटलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fight between snakes and crows you will be shocked to see the social media trending video jap

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×