Bihar police viral video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होतात. नियम मोडणाऱ्यांना पोलीस कसे धडा शिकवतात हे तुम्ही अनेकदा पाहिलं असेत, मात्र पोलिसच जर नियम तोडत असतील तर काय करायचं? असा प्रश्न तुम्हाला कधी तरी पडला असेलच. पोलिसच कायदे पाळत नसतील तर सामान्य जनतेने कुना कडे पहायचं असा प्रश्न निर्माण होतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुसऱ्या सांगे ब्रम्हज्ञान स्वत: मात्र कोरडे पाषाण, या उक्तीचा प्रत्यय या व्हायरल व्हिडीओमधून दिसून आलाय.

कायदा सुव्यस्था राखण्याचं काम करणारे पोलीस भररस्त्यात भिडल्याची घटना समोर आली आहे. बिहार पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचा हा व्हिडीओ आहे. सोहसराय रेल्वे थांब्याजवळ ड्यूटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये ही मारहाण झाली आहे.आधी धक्काबुक्की आणि नंतर लाथा-बुक्क्या आणि काठीने दोघांनी एकमेकांवर हल्ला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही पोलीस कर्मचार्‍यांवर कारवाई झाली आहे.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक पोलीस दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर पैसे घेतल्याचा आरोप करत आहे. अवैध पैसे वसुलीच्या कारणावरुन दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. उपस्थित नागरिकांनी दोन्ही पोलिसांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ते कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Video: उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग! लग्नासाठी तरुणाने पूराच्या पाण्यातून काढली वाट

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, दोन्ही पोलिसांच्या कृत्याने पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे. या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करून विभागीय कारवाई करण्यात येणार आहे

Story img Loader