scorecardresearch

चक्क विमानांमध्ये अगदी लोकलसारखीच हाणामारी, हा VIRAL VIDEO एकदा पाहाच…

लोकलच्या डब्यात जसं सीटवरून आणि धक्का लागण्यावरून जशी भांडणं होतात अगदी तसंच भांडण विमानात देखील होतात. यावर तुमचा विश्वास बसत नसेल तर हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

Flight-Video-Viral
(Photo: Twitter/ MayaWilkinsonx )

विमानात कधी प्रवाशांनी गोंधळ घातल्याचा तर कधी सेलिब्रेशन केल्याचा व्हिडीओ तुम्ही आतापर्यंत पाहिला असेल. विमानाचा प्रवास शांतपणे करतात, असंच तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल. पण लोकल ट्रेनमध्ये जशी हाणामारी होते अगदी तसंच चित्र जर विमानात तुम्हाला दिसलं तर? होय, हे खरंय. कारण विमानात तुंबळ हाणामारी झाल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. लोकलच्या डब्यात जसं सीटवरून आणि धक्का लागण्यावरून जशी भांडणं होतात अगदी तसंच भांडण विमानात देखील होतात. यावर तुमचा विश्वास बसत नसेल तर हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहत असाल, विमानातील काही लोकांमध्ये हाणामारी होऊन विमानात गोंधळ उडाला आहे. परिस्थिती अशी बनली की फ्लाइटमध्येच लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आलीय. एक क्रू मेंबर प्रवाशांमधलं भांडण सोडवण्यासाठी येतो, परंतु विमानातलं हे भांडण काही थांबत नाही. या घटनेचा व्हिडीओ सध्या बराच चर्चेत आलाय.

डच न्यूजनुसार, ही घटना यूकेच्या मँचेस्टरहून नेदरलँड्सच्या अॅमस्टरडॅमला जाणाऱ्या KLM एअरलाइनच्या फ्लाइटमध्ये घडली. फ्लाइटमध्ये काहीतरी घडल्याचा अंदाज हा व्हिडीओ पाहून येतो. फ्लाइटमध्ये काही मुद्द्यावरून दोन गटात हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. दोन्ही गटात सुरू असलेलं हे भांडण काही मिनिटांनंतर लाथा-बुक्क्या आणि ठोश्यांच्या मारहाणीत बदललं. यात एक प्रवासी जखमी झाल्याचं सांगण्यात येतंय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही लोक एकमेकांना ठोश्या बुक्क्यांनी मारहाण करताना दिसून येत आहेत. विमानातून लोकांचा जोरजोरात ओरडण्याचा आवाजही येतोय.

आणखी वाचा : एकट्या बिबट्यावर तीन-तीन रानडुक्कर शिकारीसाठी तुटून पडले, पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा : गाढ झोपेत असलेल्या माणसाकडे ही मुलं गुपचूप साऊंड बॉक्स घेऊन गेले आणि…मग काय झालं, पाहा हा VIRAL VIDEO

रिपोर्टनुसार, गुरुवारी ही घटना घडली असून विमान जेव्हा शिफोल विमानतळावर पोहोचले त्यावेळी विमानात भांडण करणाऱ्या सहा ब्रिटिश प्रवाशांना अटक करण्यात आली. याप्रकरणी विमानतळाच्या सुरक्षा प्रभारींनी तपास सुरू केल्याचं सांगितलं. तपास पूर्ण झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असं सांगण्यात येतंय.

तसंच विमानातील भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ४५ सेकंदांच्या या व्हिडीओ क्लिपला ट्विटरवर २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यावर हजारो लोकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. बहुतेक युजर्सनी फ्लाइटमध्ये गोंधळ घालणाऱ्या लोकांवर टिकेचा वर्षाव सुरू केलाय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fight broke out in sky passengers kicks and punches in plane shocking video prp