scorecardresearch

लग्नात रसगुल्ल्यावरून वऱ्हाड्यांमध्ये तुफान राडा; हाणामारीत सहा जण जखमी

रसगुल्ल्यावरून सुरू झालेल्या वादात सहा जण जखमी झाले, ज्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Fight over shortage of rasgullas at Indian wedding function in up agra six people injured
लग्नात रसगुल्ल्यावरुन वऱ्हाड्यांमध्ये तुफान राडा; हाणामारीत ६ जण जखमी, VIDEO व्हायरल

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तिथे एका लग्नसमारंभात रसगुल्ला कमी पडल्याने पाहुण्यांचा राग अनावर झाला आणि परिस्थिती इतकी बिघडली की, हाणामारीची घटना घडली. रसगुल्ल्यावरून सुरू झालेल्या वादात सहा जण जखमी झाले, ज्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर हे प्रकरण थेट पोलिसांपर्यंत पोहोचले. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली.

उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील फतेहाबाद तालुक्यातील शमसाबाद भागात ही घटना घडली आहे. रविवारी ब्रिजभान कुशवाह नावाच्या व्यक्तीच्या घरी लग्नसोहळा सुरू होता, या सोहळ्यादरम्यान सर्वकाही व्यवस्थित सुरू होते. त्याचवेळी एका व्यक्तीने रसगुल्ला कमी पडले यावरून काहीतरी टोमणा मारला, जो उपस्थित पाहुण्यांना अजिबात आवडला नाही. यावरून बाचाबाची झाली. यानंतर वाद इतका वाढला की, लग्न समारंभात थेट हाणामारी सुरू झाली. दोन्ही बाजूचे लोक लाथा-बुक्क्यांनी एकमेकांना मारू लागले, ज्यात सहा जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

bank locker rules
Money Mantra : बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या रोख रकमेवर किती फायदा मिळतो? RBI चे नियम काय? जाणून घ्या
tanker driver, car accident, vasai
वसई : टॅकरची वाहनाला धडक दिल्याने वाद, चौघांनी केलेल्या मारहाणीत टॅंकरचालकाचा मृत्यू
roads waterlogged traffic disrupted due to heavy rain in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये संततधार;पाणी साचल्याने रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी
pune heavy rain, rainwater accumulated on the roads in pune, pune street lights off due to rain
पावसाळापूर्व कामे केल्याचा महापालिकेचा दावा फोल; पुण्यातील रस्ते जलमय

पोलिसांच्या माहितीनुसार, या मारामारीत ब्रिजभान त्याची पत्नी भगवान देवी, आणि त्यांचा मुलगा योगेश सिंग तसेच मनोज, कैलास, धर्मेंद्र आणि पवन इत्यादींचा समावेश आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणाबाबत तक्रारपत्र आल्यास तपास करून योग्य ती कारवाई केली जाईल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fight over shortage of rasgullas at indian wedding function in up agra six people injured sjr

First published on: 21-11-2023 at 18:55 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×