अमूलच्या ७५ व्या वर्धापन दिन सेलिब्रेशनची एक लिंक सध्या व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाली आहे. अनेकजण एकमेकांना ही लिंक शेअर करत आहेत. या लिंकनुसार अमुक अमुक नंबरला ही लिंक पाठवल्यावर अमूलच्या ७५ व्या वर्धापन दिन सेलिब्रेशन निमित्ताने मोफत गिफ्ट देत असल्याचं त्या लिंकमध्ये आहे. आम्हाला खात्री आहे की तुम्हाला याबद्दल प्रश्न आहेत, जसे की अमूल ७५ वी वर्धापन दिन सेलिब्रेशन गिफ्ट लिंक खरी की खोटी? ती लिंक सुरक्षित आहे की नाही ?, अमूल ७५ व्या वर्धापन दिन गिफ्ट लिंक कशी कार्य करते? आणि इतर बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपण बघणार आहोत.

काय आहे व्हायरल लिंकमध्ये?

एक बनावट व्हॉट्सअॅप मेसेज व्हायरल झाला आहे, जो काही यादृच्छिक वापरकर्त्यांना मोफत भेटवस्तू देण्याचे आश्वासन देतो.मेसेजमध्ये लिहले आहे की, “प्रश्नावलीद्वारे, तुम्हाला विनामूल्य भेटवस्तू मिळण्याची संधी आहे, तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे – कोणत्या बॉक्समध्ये भेटवस्तू आहे याचा अंदाज लावा !, तुम्ही ३ वेळा प्रयत्न करू शकता.” बक्षीस असलेला गिफ्ट बॉक्स उघडण्याण्यासाठी एक टाइमर सेट आहे.

(हे ही वाचा: अवघ्या काही सेकंदात एकाच वेळी चीनमधल्या १५ इमारती झाल्या जमीनदोस्त; पाहा व्हायरल व्हिडीओ)

प्रश्नाची उत्तरे दिल्यावर, वापरकर्त्यांना विनामूल्य भेटीचा दावा करण्यासाठी बॉक्स उघडावे लागतील. एकदा तुम्ही भेट “जिंकली” की, ते गिफ्ट मिळवण्यासाठी तुम्हाला ती लिंक ५ व्हॉट्सअॅप ग्रुप किंवा २० मित्रांना संदेश शेअर करण्यास सांगितले जाते. हे काम केल्यावर तुम्ही बक्षीस जिंकू शकता असा त्यांचा दावा आहे.

काय म्हणतात तज्ञ?

सायबर तज्ञांच्या मते, या लिंकमध्ये व्हायरस आहे आणि यामुळे फसवणूक करणारे तुमचे पैसे, वैयक्तिक डेटा किंवा इतर तपशील शोधू शकतात. जेव्हा त्या लिंकला तनी तपासले तेव्हा समजले की ती लिंक अमूलच्या ऑफिशियल साइटवरची नाही. मेसेजमध्ये नमूद केलेली लिंक ही filmlazy.top या वेबसाईटवरची आहे.

(हे ही वाचा:‘या’ माणसाचे नाक आहे जगातील सर्वात लांब नाक; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद)

हॅकर्स आपला फोन किंवा कॉम्प्युटरवर मालवेअर किंवा व्हायरस इन्स्टॉल करण्यासाठी त्याचा वापर करू शकतात. जर तुम्हाला अज्ञात क्रमांकावरून मेसेज आला असेल, तर तो व्हॉट्सअॅपवर स्कॅम म्हणून नोंदवा आणि ब्लॉक करा.