Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. अशीच एक मांजर चित्रात लपलेला फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. मात्र, लोकांना ती सापडत नाहीये. पण जर तुम्ही संयमाने त्याला शोधण्याचा प्रयत्न केल्यास, तुम्हाला १३ सेकंदाच्या आत भेटेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रात तुम्हाला मांजर दिसली का?

अशाप्रकारचे ऑप्टिकल भ्रम तुमच्या दृष्टी आणि निरीक्षण कौशल्याची चाचणी घेतात. सध्या व्हायरल होत असलेला फोटो त्यातीलच एक आहे. चित्रात लपलेल्या मांजरीला शोधण्यात अनेकांनी प्रयत्न केले. मात्र, यांपैकी फक्त १% लोकांना मांजर शोधण्यास यश आले. या ऑप्टिकल इल्युजन इमेजमध्ये, आपण पाहू शकतो की एक कुत्रा आहे जो एका जुन्या झाडाजवळ उभा आहे. झाडावर काही मोजकीच पाने शिल्लक आहेत. तुम्हाला देखील या प्रतिमेत लपलेली मांजर शोधायची असेल, तर त्यासाठी तुमची नजर तीक्ष्ण असणे आवश्यक आहे.

(हे ही वाचा: Optical Illusion: चित्रात लपलेला प्रसिद्ध सेलिब्रिटीचा चेहरा तुम्ही ओळखू शकता का? ९९ टक्के लोकांनी दिलं चुकीचे उत्तर)

मांजर शोधण्यासाठी हे संकेत आहेत

पहिल्या नजरेत लपलेली मांजर ओळखणे जवळजवळ अशक्य आहे. या प्रतिमेत लपलेली मांजर फक्त उत्तम मेंदु असणाऱ्याला दिसू शकते. आपण लपलेली मांजर शोधू शकता? नसल्यास, आम्ही तुम्हाला काही पॉइंटर्ससह मदत करू.

( हे ही वाचा: VIDEO: व्यक्तीने झाडावर बनवली सर्वात सुंदर 3D पेंटिंग; Viral Video पाहून लोकही झाले थक्क!)

सूचना 1: मांजर कुत्र्याच्या आत लपली नाही आहे.

इशारा 2: मांजर चित्राच्या तळाशी नाही आहे.

अजूनही मांजर सापडले नाही?

संपूर्ण चित्र काळजीपूर्वक पहा. तरीही मांजर सापडत नसेल तर तुम्ही झाडाच्या फांद्यावर नजर टाका आणि मांजर कुठे दिसत आहे ते पहा. मांजर झाडावरचं आहे. खरं तर मांजर शोधणे कठीण होते. मात्र, ज्यांनी मांजर शोधण्यास यशस्वी ठरलेत ते जिनियस आहेत.आता तुम्ही हे कोडे तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळीना पाठवा आणि त्यांना देखील १३ सेकंदाचा टाइम द्या.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Find the cat in this picture in 13 seconds 99 percentage of people fail gps
First published on: 09-08-2022 at 17:02 IST