Finland PM Sanna Marin Viral Photo: फिनलँडच्या पंतप्रधान सना मरीन यांचा पार्टी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणी जगभरात प्रचंड गाजला. हे प्रकरण जरा शांत होत नाही तोपर्यंत आता सना यांच्या घरातील आक्षेपार्ह फोटोमुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. या फोटोवरून पंतप्रधान मरीन यांनी सर्वांची माफी मागितली असून फोटो त्वरित हटवण्यात आल्याचेही सांगितले आहे.

असं नेमकं काय आहे ‘त्या’ फोटोमध्ये

पंतप्रधान निवासस्थानी एका फोटोमध्ये दोन महिला टॉपलेस व किसिंग करताना दिसत आहे. सना मरीन यांचा पार्टी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एका सोशल मीडिया इनफ्ल्यूएंसरने हा फोटो शेअर केला होता मात्र वाद सुरु होताच हा फोटो सोशल मीडियावरून हटवण्यात आला. मरीन यांनी याविषयी माहिती देत सांगितले की, जुलै महिन्यातील एका म्युझिक फेस्टिव्हलनंतर पंतप्रधान मरीन यांच्या घरी बाथरूम मध्ये हा फोटो काढण्यात आला होता. या फोटोमध्ये मरीन स्वतः दिसत नाहीत. मात्र फोटोमधील दोन महिला या टॉपलेस असून त्यांचे स्तन फिनलँड अशा अक्षरांनी झाकलेले आहे.

miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…
pm narendra modi speaks to sandeshkhali rekha patra
पश्चिम बंगालच्या संदेशखाली येथील रेखा पात्रा यांना भाजपाची उमेदवारी; पंतप्रधान मोदी फोन करत म्हणाले, “शक्ती स्वरूप…”

‘त्या’ पार्टीत फिनलँडच्या पंतप्रधानांनी ड्रग्स घेतले होते? सना मरीन यांच्या टेस्ट रिपोर्ट मधून समोर आले सत्य

पंतप्रधान मरीन यांनी या वादावर उत्तर देत, “माझ्यामते हा फोटो अयोग्य आहे आणि असा फोटो क्लिक करणे ही चूक व्हायलाच नको होती मात्र मी आता त्यासाठी क्षमा मागते”, असे म्हंटले आहे. म्युझिक फेस्टिव्हलनंतर पंतप्रधानांच्या घरी एक खाजगी पार्टी झाली होती, त्यावेळेस हा फोटो काढण्यात आला होता. या पार्टीला आलेल्या सर्वांची सविस्तर माहिती निवासस्थानावरील सुरक्षारक्षकांना देण्यात आली होती.

सना मरीन यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर विरोधकांसह सोशल मीडियाने सुद्धा पंतप्रधानांना दारू पिऊन, ड्रग्ज घेऊन धिंगाणे करणे शोभत नाही अशी भूमिका घेतली होती. मरीन यांनी ड्रग्ज टेस्ट द्यावी अशीही मागणी सुरु होती. सुरुवातीला सना यांनी ड्रग्ज टेस्ट करायला नकार दिला होता मात्र नंतर त्यांनी चाचणी करून घेतली, या ड्रग्ज टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला होता.