बाप म्हणजे कणखर, खंबीर आणि सदैव आपल्या कुटुंबासाठी साथ देणारी व्यक्ती. पण या कणखर व्यक्तिमत्त्वाच्या मागे एक हृदय आहे, भावनांनी भरलेले. पहिल्यांदा जेव्हा तो आपल्या बाळाला हातात घेतो, तेव्हा आयुष्यात तो खरा बाप बनतो. मनात प्रचंड भीती, चिंता आणि जबाबदारीची जाणीव, डोळ्यातून वाहणारे आनंदाचे अश्रू, थरथरणारे हात अशी त्या वडीलांची अवस्था असते. पण सारं काही बाजूला सारून तो जेव्हा आपल्या बाळाला हातात घेतो तेव्हा सर्व भिती संपते. चेहऱ्यावर असतो ते फक्त. हा क्षण कोणताही बाप आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. याच क्षणाची साक्ष देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतआहे. या व्हिडिओमध्ये एका नुकत्याच बाप झालेल्या तरुणाचा आहे जो आपल्या नवजात बाळाला पहिल्यांदाच हातात घेतो. त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, हलकीशी भीती आणि जबाबदारीची जाणीव अनेकांना भावूक करत आहे.
बाळाला पहिल्यांदा कुशीत घेतना वडिलांच्या जीवाची झाली घालमेल (Father’s nervousness before holding the baby)
व्हायरल झालेल्या या क्लिपमध्ये नुकताच वडिल झालेल्या तरुणाच्या हातात डॉक्टर बाळाला देत आहे पण तो आधी घाबरतो. पकटन हात पुढे करत नाही. लहान आणि नाजूक बाळाला कसे धरावे, याबद्दल ते थोडे संकोच करताना दिसतात. त्यांच्या हात थरथरत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर मात्र आनंद आणि अविश्वास यांचे मिश्र भाव दिसतात. बाळाकडे पाहताना त्यांच्या डोळ्यांत आनंद असला तरी, ते तेवढ्याच काळजीपूर्वक पावले उचलताना दिसतात. हा क्षण अनेक पालकांना त्यांच्या स्वतःच्या आठवणींची जाणीव करून देणारा ठरला आहे.
डॉक्टरांनी दिला आधार (Doctor reassures and guides the father)
या भावनिक क्षणी त्या वडिलांच्या शेजारी उभ्या असलेल्या डॉक्टर त्यांना शांतपणे मार्गदर्शन करताना दिसतात. त्या त्यांना बाळ सुरक्षितपणे कसे धरावे हे समजावून सांगतात आणि आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करतात. डॉक्टरांच्या आश्वासक शब्दांमुळे वडिलांचा ताण हळूहळू कमी होतो आणि शेवटी ते बाळाला हळुवारपणे हातात घेतो. त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान अनेकांना भावूक करून गेला.
१२७ दशलक्षांहून अधिक व्ह्यूज Video receives massive response on social media)
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर एका डॉक्टरांनी शेअर केला असून त्यांचा अकाउंट नाव drsuganyad3vi असल्याचे सांगितले जाते. व्हिडिओसोबत त्यांनी लिहिलेले कॅप्शनही अनेकांना भावले.
“सर्वात मजबूत व्यक्तीही छोट्या आनंदाला हातात घेण्याच्या क्षणी थरथरते. हे क्षण जगले जातात आणि प्रत्येक दिवस, प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंद आठवणीत जपले जातात,” असे त्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला १२७ दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून सुमारे ६.८ दशलक्ष लाइक्स आणि ३२ हजारांहून अधिक कमेंट्स आल्या आहेत.
नेटिझन्स भावूक (Internet reacts emotionally to the viral clip)
या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हा क्षण पाहून स्वतःला अश्रू आवरता आले नाहीत, असेही लिहिले आहे.
एका यूजरने लिहिले, “हा व्हिडिओ पाहून मला रडू आले… का तेही समजत नाही.” तर दुसऱ्या एका यूजरने डॉक्टरांच्या संयमी आणि संवेदनशील मार्गदर्शनाचे कौतुक केले आहे.
अनेकांनी या कुटुंबाला शुभेच्छा देत हा क्षण पालकत्वाच्या सौंदर्याची आठवण करून देणारा असल्याचे म्हटले आहे. अशा व्हिडिओमुळे पालक आणि बाळा मधील पहिल्या स्पर्शाचे भावनिक महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
