scorecardresearch

Video: मासेमारी करणारा पर्यटकच झाला शिकार; माशाच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न केला पण…

मासेमारी करणाऱ्या पर्यटकावर माशांने अशाप्रकारे हल्ला केल्याचं तुम्ही यापुर्वी पाहिलं नसेल

Video: मासेमारी करणारा पर्यटकच झाला शिकार; माशाच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न केला पण…
माशाला पाहून पर्यटक आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं व्हिडीओत दिसत आहे. (Photo : Twitter)

सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही आपल्याला मनसोक्त हसवणारे असतात तर काही आपल्या अंगावर शहारे आणणारे असतात. सध्या असाच एक भयंकर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मासेमारी करणाऱ्या एका व्यक्तीवर माशांने हल्ला केला आहे. तो पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

अनेक लोकांना मासेमारीची आवड असते, मासेमारीसाठी ते सतत समुद्राच्या, नदीच्या काठावर तासनतास बसून राहतात. कधी गळाच्या साह्याने तर कधी फिशिंग रॉडच्या साह्याने ते मासेमारी करत असतात. सध्या अशाच एका मासेमारी करणाऱ्या व्यक्तीचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होण्याचं कारण तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येईलच.

हेही पाहा- Video: कर्म तैसे फळ! चोरी करून पळताना घडली जन्माची अद्दल; समोरुन ट्रक आला अन्…

@weirdterrifying नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओत मासेमारीसाठी एक पर्यटक बोटीतून समुद्रात पोहोचल्याचे दिसत आहे. तो बोटीच्या एका बाजूला झोपतो आणि एक छोटा मासेमारीचा रॉड समुद्रात टाकतो. त्याने तो रॉड एखादा लहान मासा पकडण्याच्या हेतून टोकतो. परंतु तिथे अचानक एवढा मोठा मासा येतो की मासेमारी करणारा घाबरुन गेल्याचं दिसत आहे.

माशाने घेतला चावा-

हेही पाहा- तिकीट दाखवलं नाही म्हणून टीसींची प्रवाशाला लाथा बुक्यांनी मारहाण, धक्कादायक Video व्हायरल

मासेमारी करणाऱ्या व्यक्तीच्या समोर अचानक एक मोठा मासा उडी मारतो आणि त्याच्या उजव्या हाताला चावायला सुरुवात करतो. या मोठ्या माशाला पाहून पर्यटक आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं व्हिडीओत दिसत आहे. लोकांचा गोंधळ ऐकून ही मासा त्या व्यक्तीचा हात सोडायचं नाव घेत नाही. अनेक प्रयत्नानंतर कसा तरी तो मासेमारी करणारा व्यक्ती आपला हा माशाच्या तावडीतून सोडवतो तितक्याच तो मासा पुन्हा त्याच्या डावा हात पकडतो.

इतर लोक मासे पकडतात आणि बोटीवर आणतात, परंतु तरीही मासा काही केल्या त्या व्यक्तीला सोडत नाही. या माशाचा पकडीतून स्वत:ला वाचवण्याचा पर्यटक खूप प्रयत्न करतो. त्यावेळी तो माशासह अनेकवेळ बोटीवर उलटा पालटा होतो, पण माशांच्या तावडीतून तो सुटू शकत नाही. ३० सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत माशाने पर्यटकाचा हात तोंडात दाबून ठेवल्याचं दिसत आहे.

आतापर्यंत हा व्हिडीओ ५ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर सात हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, ‘अरे देवा मासेमारी करणाराच इथे शिकार झाला आहे.’ तर अनेक नेटकऱ्यांनी मासेमारी करताना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-01-2023 at 11:57 IST

संबंधित बातम्या