स्वातंत्र्याचे प्रतीक असलेले गरुड आपली विलक्षण शिकार करण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जातात. गरुड जेव्हा शिकार करतो ते तेव्हा भक्ष्याला क्षणभराची उसंत देत नाही. फक्त वेगात एक झडप मारतो अन् खेळ खल्लास. गरुडाच्या शिकारीचे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. असाच एक व्हायरल व्हिडिओ पुन्हा चर्चेत आला आहे जिथे एक गरूड आपल्या पिल्लाला हवेत उडता उडता भक्ष्यावर कशी झडप मारायची हे शिकवत आहे.

Bald Eagles (पांढऱ्या रंगाचे गरूड) अमेरिकेचे सामर्थ्य आणि स्वातंत्र्याचे प्रतिष्ठित प्रतीक, उत्तर अमेरिकेच्या आकाशात अतुलनीय डौलदारपणाने विहार करतात. आपल्या आकर्षक पांढऱ्या डोक्यांनी, पिवळ्या चोचींनी आणि ७ फूट विस्ताराच्या प्रचंड पंखांनी, हे शिकारी पक्षी अलास्काच्या किनाऱ्यांपासून ते फ्लोरिडाच्या नद्यांपर्यंतच्या जलमार्गांवर राज्य करतात. हे प्राणी उथळ पाण्यात नख्या खुपसून मासे पकडण्यात पारंगत आहेत. लहान पिलांकडून त्याचे भक्ष्य निसटल्याचे दिसते पण पुढच्याक्षणी दे घडते ते पाहून व्हायरल व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिले आहेत, आणि पालक काहीही न बोलता मुलांना कसे ‘शिकवतात’ हे पाहून लोक मंत्रमुग्ध होतात.

हवेतून शिकारीचा सराव; गरुडाच्या पिल्लाला दिलं खास ट्रेनिंग

गरुड आपल्या पिल्लाला शिकार करायला कसे शिकवतो, हे या व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते. व्हिडिओमध्ये एक-दोन गरुड हवेत उडताना दिसतात. अचानक एका गरुडा पिल्लाच्या तावडीतून मासा निसटतो पण पुढच्याच क्षणी तो हवेतच झडप घालून पुन्हा मासा पकडतो. हा क्षण अत्यंत थरारक आणि विलक्षण आहे, जो पाहून नेटकरी मंत्रमुग्ध झाले आहेत.

गरुडाच्या पिल्लांसाठी शिकारीत पारंगत होण्यासाठी हे हवेत अन्न हाताळण्याचं प्राथमिक प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. या कौशल्यात प्रावीण्य मिळवण्यासाठी साधारण एक वर्षाचा कालावधी लागू शकतो. सुरुवातीला पिल्ले वारंवार अपयशी ठरतात, मात्र सततच्या सरावामुळे ती उत्कृष्ट शिकारी बनतात.

“पालक सर्वोत्तम शिकवतात” म्हणत नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी “पालक सर्वोत्तम शिकवतात अशा कमेंट्स केल्या आहेत. कारण हा फक्त व्हायरल क्षण नाही, तर फक्त जंगलातील एक प्रसंग दाखवत नाही तर गरुड पक्षी आणि त्याच्या पिल्लामधील नातेही दाखवत आहे. गरुडांच्या पिल्लांकडे शिकारीचं कौशल्य जन्मतः येत नाही; ते सततच्या सरावातून विकसित होतं, हे या व्हिडीओत स्पष्ट दिसतं.

गरुडाची पिल्ले कठीण अनुभवातून कसे शिकतात

गरुड आपल्या ४ महिन्यांच्या पिल्लांसाठी अख्खे मासे किंवा तुकडे घरट्यात टाकतात. उडण्यास शिकलेली पिल्ले अनेकदा अनेकदा ते मोठ्या गरुडांच्या मागे फिरत शिकार कशी करायची हे निरीक्षणातून शिकतात.

गरुडाच्या पिल्लांना शिकारी शिकण्यासाठी जवळपास वर्षभर लागतो

‘जर्नी नॉर्थ’ने उद्धृत केलेल्या तज्ज्ञांच्या मते, उडण्यास शिकल्यानंतर शिकारीत पूर्णपणे पारंगत होण्यासाठी ४२ आठवड्यांपर्यंतचा काळ लागू शकतो आणि विशेष कौशल्ये विकसित करण्यासाठी त्याहूनही जास्त वेळ लागू शकतो. सुरुवातीचे अनेक प्रयत्न अयशस्वी होतात, पण जिद्दीने केलेला सरावच त्यांना जंगलातील ‘किंग ऑफ स्काय’ बनवतो.

पाण्याजवळ का राहतात गरुड

बाल्ड ईगल्स तलाव, नद्या आणि समुद्रकिनाऱ्यांजवळ राहणे पसंत करतात, जिथे मासे मुबलक प्रमाणात असतात आणि त्यांच्या आहाराचा मोठा भाग माशांचाच असतो. हे गरुड पाण्यात पूर्ण बुडत नाहीत, तीक्ष्ण नखांनी तर पाण्याच्या पृष्ठभागाजवळून विजेच्या वेगाने मासा उचलतात, परंतु ते पक्षी, मेलेले प्राणी किंवा कचरातील तुकडेदेखील खातात. त्यांच्या पंजांवरील विशेष पकड माशासारख्या निसरड्या शिकार पकडण्यासाठी मदत करते. म्हणूनच त्यांना जगातील सर्वात प्रभावी शिकारी पक्ष्यांपैकी एक मानलं जातं. ते अलास्का, कॅनडा, अमेरिकेची दक्षिणेकडील राज्ये, उत्तर मेक्सिको आणि सेंट पिएर व मिकेलॉनसारख्या ठिकाणी आढळतात आणि बहुतेकदा खुल्या पाण्याच्या काठावर राहतात. हिवाळ्यात, ते धरणे, मत्स्य प्रक्रिया केंद्रे किंवा कचरा टाकण्याच्या ठिकाणी एकत्र जमतात; त्यांची घरटी उंच झाडांवर, कधीकधी कड्यांवर किंवा खांबांवर असतात.