जेव्हा मच्छिमारांचा एक समूह मासेमारी करून घरी पोहोचला तेव्हा त्यांना १६ फूट लांबीचा एक समुद्री जीव आढळला ज्याची त्यांनी शिकार केली होती. स्थानिक लोकांना हा प्राणी पाहून धक्का बसला आणि त्यांनी याला ‘अशुभ’ संकेत म्हणायला सुरुवात केली. मच्छिमारांनी चिलीच्या किनाऱ्यावर हा महाकाय ओअरफिश पकडला आणि समुद्रातून बाहेर काढताच एरिका शहरातील लोक समुद्रकिनाऱ्यावर जमा झाले. टिकटॉकवर या माशाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये लांब मासा डोक्याला जोडलेल्या हुकला लटकलेला दिसत आहे.

डेलीस्टारच्या बातमीनुसार, या माशाला ‘किंग ऑफ द हेरिंग्स’ म्हणूनही ओळखले जाते. त्याची लांबी १६ फुटांपेक्षा जास्त आहे. खोल पाण्यातील मासे भविष्य सांगण्याच्या क्षमतेसाठी देखील ओळखले जातात, विशेषत: २०११ नंतर जेव्हा फुकुशिमा भूकंपाच्या आधी जपानमध्ये डझनभर प्राणी दिसले होते. या माशाच्या व्हिडीओला १ कोटींहून अधिक युजर्सनी लाइक केले आहे, मात्र स्थानिकांनीही भूकंपाच्या भीतीने चिंता व्यक्त केली आहे.

Shadashtak Yog 2024 and Impact on Rashi in Marathi
Shadashtak Yog: १८ वर्षांनंतर केतू- गुरुचा विनाशकारी ‘षडाष्टक योग’, ‘या’ राशीच्या लोकांवर कोसळणार संकट?
mumbai ban on slum demolition marathi news, slums mumbai marathi news
झोपडपट्टी पुनर्विकासात परवानगीविना अतिरिक्त झोपड्या तोडण्यावर बंदी, नव्या परिपत्रकामुळे झोपडीवासीयांना दिलासा
multi color grapes export demand decline at global level
निर्यातीसाठी रंगीत द्राक्षांना मागणी घटली; जाणून घ्या कारणे काय ?
sudha murty net worth rs 775 crore but hasnt bought new saree in 30 years read behind story
…म्हणून सुधा मूर्तींनी ३० वर्षांत एकही साडी घेतली नाही विकत; कारण एकदा वाचाच

आणखी वाचा : सांगा पाहू या PHOTO मध्ये कुत्रा कुठे लपला आहे? शोधा म्हणजे नक्की सापडेल!

या व्हिडीओ लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. एक युजर म्हणाला, ‘आता आम्ही कुठे पळू?’ आणखी एका युजरने याला ‘भयानक मासा’ म्हटले आहे. दुसऱ्या एका युजरने दावा केला आहे की ओअरफिश खोलवर राहतात. असे म्हणतात की जेव्हा हे मासे पृष्ठभागावर येऊ लागतात तेव्हा याचा अर्थ असा होतो की टेक्टोनिक प्लेट्स हलत आहेत. काही लोकांचा असा विश्वास आहे की ज्याला हा मासा मिळेल तो शापित होतो. एका युजरनेही याला सहमती दर्शवली.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : एका बॉयफ्रेंडसाठी मुली भिडल्या, एकमेकींच्या पार झिंज्या उपटल्या; पाहून पोलीसही हैराण

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला

मासे पृष्ठभागावर का येतात?
दुसर्‍या यूजरने लिहिले, ‘अरे, त्यांनी ते का पकडले?’ ओअरफिश खोल पाण्यात राहतो आणि आजारी असताना, प्रजननाच्या वेळी किंवा मृत्यूनंतरच पृष्ठभागावर येतो. त्यामुळे हवामानातील बदलामुळेच मासे परत पृष्ठभागावर येतात, असा अंदाज आहे. पण, या सिद्धांताची अद्याप खात्री झालेली नाही. त्यांचे लांब चांदीचे शरीर रिबनसारखे दिसते.