….आणि बघता बघता विमानातल्या प्रवाशांनी गाण्यांची मैफल रंगवली

विमान प्रवास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं, यात प्रत्येकजण आपआपल्या धुंदीत बसलेला असतो. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये विमानात एक वेगळंच चित्र दिसून आलं. यावर तुमचाही विश्वास बसणार नाही.

flight-passengers-sing-viral-video
(Photo: Instagram/ mohd_magdi)

विमान प्रवास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं, यात प्रत्येक सुशिक्षित लोकं एखाद्या पुस्तकाचं वाचन करताना, तर काही प्रवासी हे कानात भलेमोठे हेडफोन लावून गाणी ऐकताना दिसतो. प्रत्येकजण आपआपल्या धुंदीत बसलेला असतो. पण सध्या एका विमानतला एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागचं कारणही तसंच आहे. कारण हा व्हिडीओ विमानतला असला तरी आतलं सारं चित्र पाहून त्यावर विश्वास ठेवणं प्रत्येकालाच अवघड जात आहे. विमानतला प्रवास असाही होऊ शकतो का? असं प्रत्येकजण विचारताना दिसून येतोय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये विमानतील सर्व प्रवासी चक्क अंताक्षरी खेळताना दिसून येत आहेत. काय? आश्चर्य वाटलं ना…? पण हे खरंय. या व्हायरल व्हिडीओमध्ये विमानातील प्रवाशांनी चक्क बॉलिवूड गाण्यांची मैफल रंगवलीय. विमानात प्रवास करणारी एक महिला प्रवाशी बॉलिवूडमधलं खूपच जून गाणं ‘सज रही गली मेरी मां…’ हे गाताना दिसून येतेय. हे गाणं ‘कुंवारा बाप’ या चित्रपटातलं असून गायक महमूद यांनी खूपच सुंदर पद्धतीने गायलंय. या व्हिडीओमधील ही महिला प्रवासी गाणं गात असताना इतर प्रवाशांसोबत धम्माल मस्ती करताना दिसून येतेय. विमानातील इतर प्रवासी सुद्धा तिच्या सुरात सुर मिळवताना आणि टाळ्या वाजवताना दिसून येत आहेत.

विमानातला हा व्हायरल व्हिडीओ पाहून सुरूवातीला विश्वास होत नाही. एखाद्या पिकनीक व्हॅनमध्ये ज्या प्रमाणे धम्माल मस्ती सुरू असते अगदी त्याप्रमाणे सुरू असलेला एन्जॉय पाहून सोशल मीडियावर नेटिझन्स या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स देताना दिसून येत आहेत. विमान आहे की लोक ट्रेन? असे प्रश्न या व्हिडीओच्या कमेंट्स सेक्शनमध्ये लोक विचारताना दिसून येत आहेत.

mohd_magdi नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत १ लाख २० हजार व्ह्यूज मिळाले आहेत. विमानातल्या शांततेला बदलून अशी मजा मस्ती करतानाचा हा व्हिडीओ नेटिझन्सच्या पसंतीस पडताना दिसून येतोय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घालताना दिसून येतोय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Flight passengers sing bollywood song on flight video viral on instagram prp

Next Story
VIDEO : ‘धीरे धीरे’ गाणे तेही संस्कृतमध्ये ऐकलेत का तुम्ही?