मासे पकडत होते मित्र; अचानक आला विशालकाय शार्क अन् जबड्यात पकडली बोट; नंतर… बघा Shocking Video

“श्वास रोखणारा तो अनुभव होता. एक भलामोठा शार्क आमच्या बोटीजवळ आला आणि…

सोशल मीडियावर एका पांढऱ्या विशालकाय शार्कचा (great white shark) व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ फ्लोरिडाच्या टाम्पा खाडीत (Tampa Bay in Florida) मासे पकडण्यासाठी गेलेल्या काही मित्रांनी रेकॉर्ड केलाय.

“श्वास रोखणारा तो अनुभव होता. एक भलामोठा शार्क आमच्या बोटीजवळ आला आणि जबड्यात बोटीचा एक भाग पकडला. जेव्हा तुम्ही मासे पकडायला जातात तेव्हा शार्क दिसण्याची शक्यता आहे हे तुमच्या डोक्यात असतं. पण जे घडलं ते खूप अनोखं होतं. एक 14 ते 16 फुटाचा मोठा शार्क अचानक आमच्या समोर आला. आम्ही काय बघतोय यावर आमचा विश्वासच बसत नव्हता” असं एरिका अलमंड (Erika Almond) हिने ‘फॉक्स 13 टाम्पा बे’सोबत (Fox 13 Tampa Bay) बोलताना सांगितलं.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, एरिका अलमंड या आपल्या टायलर लेवेस्क, पीटर लेम्बी, आणि ग्रेचेन कूपर नावाच्या मित्रांसोबत “ऑफशोर थेरेपी” (Offshore Therapy) नावाच्या बोटीवर होत्या त्यावेळी ही घटना घडली. एलमंडने हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे, यात एक मोठा पांढरा शार्क बोटीचा काही भाग जबड्यामध्ये पकडताना दिसतोय. टायलर लेवेस्क बोटीचे कॅप्टन होते. त्यांनी शार्कला दूर करण्याचा बराच प्रयत्न केला पण तोपर्यंत शार्कने बोटीच्या मोटारीचा काही भाग वेगळा केला होता.

विशालकाय पांढरा शार्क पृथ्वीवरचा सर्वात मोठा शिकारी मासा म्हणून ओळखळा जातो. याची लांबी 20-फुटापर्यंत असू शकते. बघा व्हिडिओ

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Florida great white shark bites boat in viral video sas

ताज्या बातम्या