सोशल मीडिया म्हटलं की व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ. रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. काही व्हिडीओ असे असतात की आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. त्यामुळे असे व्हिडीओ वारंवार पाहून खात्री केली जाते. पण बऱ्याचदा व्हिडीओ एडिट करून धूळफेक केली जाते. त्यामुळे सहजासहजी कोण विश्वास ठेवत नाही. मात्र तरीही असे व्हिडीओ वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती रस्त्यावर गाडी चालवताना दिसत आहे. थोड्या अंतरावर गेल्यानंतर गाडी हवेत उडू लागते.

व्हायरल व्हिडीओत एक व्यक्ती रस्त्यावर गाडीत बसलेला दिसत आहे. तेव्हा एक आणखी ड्रायव्हर जवळ येतो आणि त्यांच्यात काहीतरी चर्चा होते. त्यानंतर लाल रंगाच्या गाडीतील व्यक्ती कार वेगाने पळवतो आणि थोड्या अंतरावर गेल्यानंतर दरवाज्यांचा पंखासारखा वापर करतो. त्यामुळे गाडी पक्षासारखी हवेत उडू लागते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येक जण आश्चर्यचकीत होतो. कारण हे कसं शक्य आहे असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. हवेत उडणाऱ्या कारमध्ये दुसरे कोणी नसून सायरस डोबरे हा प्रसिद्ध संगीत कलाकार बसला आहे आणि तोच ही कार चालवत आहे. हा व्हिडीओ त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

Double MA and PhD Lady Selling tea on road
MA, Ph.D ची डिग्री असूनही विकतेय रस्त्यावर चहा, महिलेनी सांगितले कारण, VIDEO Viral
Tigress chilling in a jungle stream on a hot summer
Viral Video : हाय गर्मी! उन्हाचा तडाखा सहन झाला नाही म्हणून वाघीन अशा ठिकाणी जाऊन बसली की तुम्ही…
robbing shopkeepers
दुकानदारांना लुटण्याचा हा नवीन प्रकार तुम्ही पाहिला आहे का? व्हिडीओ पाहा अन् सतर्क व्हा
man riding on bull viral video
बापरे! भररस्त्यावर तरुण झाला रेड्यावर स्वार! व्हायरल Video पाहून तुम्हीही व्हाल हैराण…

आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. तसेच लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे. हे ग्राफिक्स आहे की खरंच असं झालं आहे याबाबत संभ्रम मात्र कायम आहे.